राष्ट्रीय योग स्पर्धेत प्रतिभा राजपूत यांना सुवर्ण पदक
शेंदरकर यांना रौप्य तर घोडेस्वार यांना कांस्य पदक
●मिररवृत्त
●नांदगाव पेठ
श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावतीयेथे पार पडलेल्या तिसऱ्या खुल्या राष्ट्रीय योग स्पर्धेत योग निसर्गोपचार, आहार तज्ञ डॉ. मेघा ठाकरे यांच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रतिभा राजपूत यांनी ५५ अधिक वयोगटातील योग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले तर आयुष आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नांदगाव पेठ येथील नियमित योग वर्गातील उषा शेंदरकर यांनी ५५ अधिक वयोगटात रौप्य पदक तर २८ ते ३५ वयोगटांमध्ये सीमा घोडेस्वार यांनी कांस्यपदक पटकाविले.तीनही विजेते स्पर्धक डॉ.मेघा ठाकरे यांच्या प्रशिक्षण केंद्रातील आहे.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन अमरावती, बृहन महाराष्ट्र योग परिषद ( महाराष्ट्र ओलंपिक असोशिएशन मान्यता प्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी राष्ट्रीय खुली योगासन स्पर्धा २८ सप्टेंबर रोजी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडली.यामध्ये विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते.डॉ. मेघा ठाकरे यांच्या अमरावती व नांदगाव पेठ येथील योग प्रशिक्षण केंद्रातील तीनही स्पर्धकांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर नाव कोरले असून याव्यतिरिक्त डॉ. चंदनसिंग राजपूत यांनी पाचवा क्रमांक पटकावला तर डॉ. शितल धनभर,मनीषा कावळे, सीमा राठी यांनी देखील उत्कृष्ट प्रात्यक्षिके केली.
या स्पर्धेच्या यशस्वी अयोजना साठी श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ माधुरी चेंडके, डॉ.श्रीनिवास देशपांडे, डॉ अरुण खोडसकर, डॉ सुनील लाबड़े,नितिन काळे, डॉ. मयूरेश शिंगरूप व डॉ विशाल खोड़सकर यांचे विशेष परिश्रम होते.
विजयी स्पर्धकांचे आरोग्यम् येथील संपूर्ण टीम व आयुष आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नांदगाव पेठ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जुबेर अली व जिल्हावासीयांच्या वतीने सर्वत्र कौतुक होत आहे.