स्फूर्ती आणि विजयाचं प्रतीक म्हणजे तुतारी-प्रा.डॉ.हेमंत देशमुख
●शुभम वाघमारे प्रथम पुरस्काराचे मानकरी
●अचलपूरचे प्रवीण थोरात यांना द्वितीय,तर विनायक वाळके यांना तृतीय पुरस्कार
●ऐतिहासिक ठरली तुतारी वादन स्पर्धा
●मिररवृत्त
●अमरावती
केवळ सण आणि उत्सवातच तुतारीचा वापर होत असला तरी तुतारी हे वाद्य शौर्याचं,आनंदाचं तसेच ते स्फूर्तीचं आणि विजयाचं देखील प्रतीक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.हेमंत देशमुख यांनी केले.
जाधव पॅलेस नवाथे चौक अमरावती येथे पार पडलेल्या पहिल्या व ऐतिहासिक अशा तुतारी वादन या अभिनव स्पर्धेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माजी उच्च शिक्षण सहसंचालक तथा संगीत तज्ञ डॉ.भोजराज चौधरी यांची उपस्थिती होती. अमरावतीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तुतारी वादन करणाऱ्या कलावंतांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेत शुभम वाघमारे हे प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले.त्यांना सात हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक अचलपूरचे प्रवीण थोरात यांना रोख पाच हजार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर विनायक वाळके यांना रोख रक्कम तीन हजार,सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अजय खडसे व विजय वाकोडे यांना प्रोत्साहन पारितोषिक प्राप्त झाले. यावेळी पुढे बोलताना प्रा.हेमंत देशमुख यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, व्यवसायाला चालना मिळावी व या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना देखील व्यासपीठ मिळावं तसेच लुप्त पावत चाललेली ही कला पुन्हा व्यापक व्हावी,असे मत व्यक्त करून या कलेला खूप मोठा ऐतिहासिक वारसा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
तुतारी स्पर्धेत सहभागी झालेले सर्वश्री अर्जुन गोळे, लखन थोरात, शंकरराव वाघमारे, रामेश्वर इंगोले, जगदीश कलाने, सुधाकर खडसे, किशनराव हिवराळे, गजानन खडसे, सुधाकर लोंढे, प्रकाश अंभोरे, सौरभ माने, शाम खंडारे, गणेश गुगलमाने, दत्ता कलाने, नितीन थोरात, वासुदेव वाघमारे आदी कलावंताच्या सादरीकरणामुळे त्यांचादेखील मान्यवरांनी सन्मान केला. उल्लेखनीय म्हणजे ज्येष्ठ तुतारी वादक अंबादासजी खंडारे यांचा नवीन तुतारी, शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सय्यद मन्सूर,रोशन कडू, डॉ.दीपक देशमुख,सतीश चरपे,विशाल बोरखेडे,वर्षाताई भटकर, मंगेश भटकर, वर्षाताई गतफने, वेदांत उगले, गौरव वाटणे,राहुल चोधरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेचे परीक्षण डॉ.भोजराज चौधरी व प्रा. डॉ.अतुल पाटील यांनी केले संचालन वैभव निमकर यांनी तर आभार प्रदर्शन शंतनु कणसे यांनी केले.
●हा कलावंतांचा सन्मान●
या तुतारी स्पर्धेचा जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासामध्ये नोंद होईल. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तुतारीचा सन्मान केला. प्रा. हेमंत देशमुख यांनी केवळ स्पर्धा आयोजित केली नाही तर लोककलावंतांचा सन्मान केला. राजाश्रेया शिवाय कला जिवंत राहू शकत नाही .कोणताही शुभ कार्यप्रसंगी तुतारीचा मान हा मोठा असतो मात्र गेल्या काही वर्षापासून तुतारी व तुतारी वाजवणारे कलावंत संपणार की काय अशी भीती होती. मात्र अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे ही कला निश्चितच जिवंत राहील व नवनवीन कलावंत निर्माण होतील असे मत संगीत तज्ञ डॉ.भोजराज चौधरी यांनी व्यक्त केले.