spot_img

सरकार बचाव बजेटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला निषेध, केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

सरकार बचाव बजेटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला निषेध

●केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निषेध आंदोलन

●मिररवृत्त
●अमरावती

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राज्याला सावत्रपणाची वागणूक दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यावर अन्याय करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि बिहार राज्याला भरीव तरतूद देत महत्त्वाच्या राज्यावर दुर्लक्ष करून केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याला सावत्रीपणाची वागणूक देत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. केंद्र सरकारने सादर केलेले बजेट हे सरकार बचाव बजेट आहे महाराष्ट्रातील जनता या सरकारला कधीही माफ करणार नाही.आगामी निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष प्रा.हेमंत देशमुख यांनी दिला आहे. मोदी सरकार हे केवळ श्रीमंताचे व व्यापाऱ्यांचे सरकार असून यांना सत्ते शिवाय काही दिसत नाही. देशाला भरभरून देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाटायला काहीच आले.नाही त्यामुळे आम्ही या बजेटचा व केंद्र सरकारचा निषेध करत असल्याच्या भावना जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी व्यक्त केल्या. यावेळी निषेध आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहराध्यक्ष प्रा.हेमंत देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, राजेंद्र चींचमलातपुरे,सय्यद मन्सूर, शहर महिला अध्यक्ष वर्षाताई भटकर,शहर युवक अध्यक्ष रोशन कडू, दिलबर शहा, शुभम नागपुरे,अपंग सेल शहराध्यक्ष सचिन गजभिये.रोहित चौधरी. निलेश गणवीर, वसंत पाटील ,अब्दुल मोमीन, विशाल बोरखडे ,रावसाहेब वाटाणे ,मनोज अरमळ ,सुनील कीर्तनकार,रवी पडोळे,गौरव वाटाणे, वहीद खान,सतीश चरपे, वेदांत उगले, रणवीर पाटील, दर्शन राजूरकर, आयुष हिमाने, शंतनू राऊत,गौरव टाक, शंतनू कणसे, आयुष गायकवाड ,रवींद्र लाहे, सार्थक पांडे, वेदांत बंड, ओम साबळे , सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष अक्षय ढोले आदींनी आंदोलनात सहभाग घेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!