spot_img

स्मृतीशेष श्री दादासाहेब गवई यांचा स्मृतिदिन व कारगिल विजय दिवस निमित्त २६ जुलैला भव्य रक्तदान शिबिर.

स्मृतीशेष श्री दादासाहेब गवई यांचा स्मृतिदिन व कारगिल विजय दिवस निमित्त २६ जुलैला भव्य रक्तदान शिबिर.

●तक्षशिला महाविद्यालयाचे आयोजन

●मिररवृत्त
●अमरावती

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा स्मृतीशेष श्री दादासाहेब गवई यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तसेच डॉ. आई कमलताई गवई यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त व संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ वा.पु. राउत यांच्या जयंती औचित्य साधुन दि. १३ जुलै ते २६ जुलै सामाजिक उपक्रम पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, कृषी मार्गदर्शन असे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे त्यापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबीर आहे. दिनांक २६ जुलै ला स्मृतीशेष श्री दादासाहेब गवई यांचा स्मृतीदिन व कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून तक्षशिला महाविद्यालय श्याम नगर, अमरावती येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई राजेशची अर्जुन आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौन्दडे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा.पी.आर.एस.राव, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन म. पंडीत, डॉ. बाबासाहेब आबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, तक्षशिला महाविद्यालय दारापुरचे प्राचार्य डॉ. मल्लु पडवाल, डॉ. कमलताई गवई इंजिनिइरिंग कॉलजचे प्राचार्य डॉ. एस.टी.वरघट तक्षशिला पॉलिटेक्निकचे प्राचार्य शैलेश शेकापुरे, रामकृष्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा माकोडे, कमलप्रकाश फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. मनवर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

तरी या रक्तदान शिबीरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयार्ची चमू रक्तसंकलन करणार आहे. तरी या शिबिरामध्ये रक्तदात्यानी रक्तदान करण्याचे आवाहन प्रा. प्रीतेश पाटील, डॉ. प्रवीण वानखडे, डॉ. नवल पाटील, प्रा. सचिन कुमरे, डॉ. प्रशांत खेडकर, डॉ. अनिल भगत, डॉ. सुनिलकुमार, डॉ. ओ.एस. बोबडे, डॉ. दिनेश धाकडे, प्रा. चेतन जंवजाळ, प्रा. निहाल मेंदुल, डॉ. अनिल नागदेवते, डॉ. रजनी भाकरे, डॉ. संतोष यावले, डॉ. पंकज चौधरी यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!