spot_img

असदपूर येथील एकयान इंग्लिश स्कूल चे उद्घाटन संपन्न

असदपूर येथील एकयान इंग्लिश स्कूल चे उद्घाटन संपन्न

•मिररवृत

•अमरावती प्रतिनिधी

व्यक्ती, समुदाय आणि संपूर्ण समाजासाठी शिक्षण आवश्यक आहे. जीवनातील समस्या सोडवणे आणि संवाद कौशल्ये विकसित करने नवकल्पना आणि स्पर्धात्मकतेमध्ये योगदान देने त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास करणे हा उद्दात हेतू लक्ष ठेऊन गोविंद चॅरिटेबल सोसायटी, अमरावती चे अध्यक्ष तात्यासाहेब उर्फ अंबादास तायडे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एकयान इंग्लिश स्कूलचे अधिकृतपणे असदपूर येथे उद्घाटन करण्यात आले, सदर स्कूल ही शैक्षणिक परिदृश्यातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानल्या जात असून . सदर शाळेमध्ये अध्यापन आणि शिकण्याच्या क्रियाकलापांसाठी प्रशस्त वर्गखोल्या , मुबलक पुस्तके शारीरिक शिक्षण, खेळ आणि मनोरंजनासाठी विस्तृत मैदान आणि खेळणी संमेलने, कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी मुबलक जागा , वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी प्रसाधनगृहे डिजिटल शिक्षण, प्रोग्रामिंग आणि तंत्रज्ञान कौशल्यांसाठी संगणक पशिक्षण उपलब्द करण्यात येत आहे.उद्घाटन समारंभास सचिव डॉ. शितल तायडे, खजिनदार डॉ. स्मिता तायडे, सदस्य वैभव तायडे व शुभम राऊत यांच्यासह मान्यवर अतिथी आणि पालक उपस्थित होते.एकयान इंग्लिश स्कूल आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे. शाळेने नर्सरी , ज्युनियर केजी आणि सीनियर केजी पर्यंतचे वर्ग सुरू केले आहेत, जे शैक्षणिक उत्कृष्टता, सर्जनशीलता आणि चारित्र्य विकासाला चालना देण्यासाठी डिझाइन केलेला सर्वसमावेशक अभ्यासक्रम या ठिकाणी शिकविण्यात येणार आहे त्याच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि समर्पित शिक्षकांसह, एकयान इंग्लिश स्कूल या विभागात दर्जेदार शिक्षणाचे दीपस्तंभ बनण्यास तयार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!