गुरूपौर्णिमानिमित्य मित्र व कार्यकर्त्यांनी केला दुग्धाभिषेक
●प्रा.मोरेश्वर इंगळे यांना आगळी वेगळी भेट
●मिररवृत्त
●नांदगाव पेठ
प्रत्येकाच्या जीवनात मित्रांना अनन्यसाधारण महत्व आहे.सुखदुःखात खरा सोबती केवळ मित्र असतात.गुरूपोर्णिमेला आपल्या गुरुंसोबतच आईवडील यांचे पूजन केले जाते मात्र युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस प्रा.मोरेश्वर इंगळे यांच्या मित्रांनी तसेच कार्यकर्त्यांनी आपल्या मित्राप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेला प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा दुग्धाभिषेक करून जिवलग मित्राला आगळी वेगळी भेट दिली.
रविवारी गुरुपौर्णिमा असल्याने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले.मात्र यामध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाने नांदगाववासी अगदी भारावून गेले. प्रा.मोरेश्वर इंगळे बालवयापासून शिवसेनेशी जुळलेले आहेत. मागील चार वर्षात ते राजकारणात सक्रिय झाले असून त्यांची धडपड आणि कार्य पाहून त्यांना युवासेनेने जिल्हा सरचिटणीसपदी जबाबदारी सोपविली.आपल्या परिसरातील महत्वाच्या मुद्द्यांवर आक्रमक होऊन त्या मुद्यांना न्याय देणे सोबतच मित्रांनी संकटकाळात मारलेल्या हाकेवर संकटमोचक म्हणून धावणे या वृत्तीमुळे येथील ईगल ग्रुपच्या मित्रांनी तसेच कार्यकर्त्यांनी गुरूपौर्णिमेला एकत्र येऊन बस स्टॅण्ड परिसरात प्रा.मोरेश्वर इंगळे यांचा दुग्धाभिषेक करून त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
अनेक मित्र आणि कार्यकर्ते यांनी प्रा.मोरेश्वर इंगळे यांना गुरुस्थानी बसवून त्यांचे पूजन केले, हारार्पण केले तसेच दुग्धाभिषेक केला यावेळी अनेक मित्रांचे डोळेदेखील पाणावले होते.अचानक मित्रांनी दाखवीलेल्या या प्रेमामुळे प्रा.मोरेश्वर इंगळे यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी ईगल ग्रुप, ईगल गणेशोत्सव मंडळ, युवासेनेचे सचिन कळसकर, मोहित राजगुरे,ओम् राऊत ,रोहित गिरी, अर्जुन घाटे, श्याम अकोलकर, राम ठोंबरे, सूरज बैस, संदीप नागापुरे,आकाश लबडे,गौरव लबडे, सुनील लहाडके,सुनील काळे,प्रशांत जवंजाळ, प्रशांत साकोरे, प्रशांत भाऊ सचिन हटवार,राज खाजोने,चेतन खाजोने, मंगेश आखरे यांचेसह असंख्य कार्यकर्ते, मित्रपरिवार उपास्थित होते.