प्रहार जनशक्ती पक्षाचा पक्षप्रवेश सोहळा थाटात
●बडनेरा येथील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
●मिररवृत्त
●अमरावती
दिव्यांग, गरीब, गरजू तसेच रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा या तत्त्वावर चालणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्ष हा दिवसेंदिवस विस्तृत्व मोठा होत चाललेला आहे. माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिव्यांग हृदयसम्राट बच्चू कडू यांच्या कामाला प्रेरित होऊन विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करीत आहे. गुरुवारी ( दि . १८) शासकीय विश्रामगृह येथे प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसु व महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात बडनेरा येथील विविध पक्ष आणि राजवीर संघटनेचे पदाधिकाऱ्यानी जाहीर प्रवेश केला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशित कार्यकर्त्यांना प्रहार जनशक्ती पक्षात विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये प्रहार युवक आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून अभिजित देशमुख यांची पुन्हा निवड झाली. शहर युवक आघाडी अनुप बोंडे, उपशहर प्रमुख सागर देवतळे, तर शहरातील विविध प्रभाग प्रमुख म्हणून लीलाधर सहस्रबुद्धे, वेद देशमुख, हर्षवर्धन चौधरी, फैजान शेख, विशू पाटील, ललित सारसर, इफ्तेकार अहमद, संजय जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजिक अली शहा, तर फैजान खान, आमिर खान, सोहेल खान, रेहान खान, आबिद अली, शाहीद खान आदींचा समावेश आहे. दरम्यान निवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा महासचिव शेख अकबर, संपर्क प्रमुख गोलू पाटील, शहर महासचिव अभिजित गोंडणे, संघटक प्रमुख श्याम इंगळे, प्रशांत शिरभाते, मनिष पवार, विक्रम जाधव कुणाल खंडारे, अजय तायडे, अमन गौरवे आदी उवस्थित होते.