जम्मू कश्मीर येथील खुल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याला सिल्वर व ब्राँझ पदक
●मिररवृत्त
●अमरावती
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने जम्मू कश्मीर येथे आयोजित केलेल्या खुल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत अमरावतीच्या राजपूत दाम्पत्याने सिल्व्हर आणि ब्राँझ पदक पटकाविले.या स्पर्धेत देश विदेशातील योग पटूंनी सहभाग नोंदविला होता. अमरावती येथील आरोग्यम् धन योग क्लासच्या योग शिक्षिका डॉ.मेघा ठाकरे यांच्या योग कक्षेतील डॉ. प्रतिभा राजपूत व डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी हे उभयंता पदकाचे मानकरी ठरले आहेत.
२४ आणि २५ जून रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने जम्मू कश्मीर येथे आयोजित केलेल्या खुल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विविध वयोगटात ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.५५+ या वयोगटात झालेल्या स्पर्धेत डॉ. प्रतिभा राजपूत व डॉ.चंदनसिंह राजपूत यांनी उत्तम योग प्रात्यक्षिके सादर करून या स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली.
यामध्ये डॉ. प्रतिभा राजपूत यांनी ब्राँझ तर डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी सिल्वर पदक प्राप्त केले.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने उभयंतांचा पदक बहाल करून सन्मान करण्यात आला.
नुकताच राजपूत दाम्पत्याचा आरोग्य टीमच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी योग शिक्षिका डॉ.मेघा ठाकरे ,शितल घुटे, उज्वला ताथोडे, कीर्ती तायडे,रोहिणी काकड ,मनीषा कावळे,शितल जामकर ,रिता वानखडे, मीनल काकड ,उज्वला चव्हाण, योगिता नानोटकर, निशा राठी ,कविता गतफने, नीलिमा वाटोळे, शेळके काकू, स्नेहा शेळके, सुषमा बगाडे, कल्याणी, भाग्यश्री यांचेसह आदी सदस्य उपस्थित होते.