spot_img

साहित्य जल्लोशच्या विठूच्या नाम गजरात वसईकर सांगीतिक वारीत झाले तल्लीन .

साहित्य जल्लोशच्या विठूच्या नाम गजरात
वसईकर सांगीतिक वारीत झाले तल्लीन

◆मिररवृत्त
◆आशिष राणे,वसई

जय जय रामकृष्ण हरीच्या नाम गजरात साहित्य जल्लोशाने आयोजित केलेल्या नामाचा गजर कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि अवघे सभागृह विठ्ठलमय झाले. त्या नंतर मग एका मागून एक संतांचे अभंग रसिकांची दाद घेत होते. या सांगीतिक वारीत मनाने रसिक पंढरपूरची वाट चालत होते. निमित्त होते ते वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, यंग स्टार्स ट्रस्ट व समाज उन्नत्ती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरीच्या पांडुरंगाच्या ‘नामाचा गजर’ करण्यात या कार्यक्रमाचे . वसई पश्चिमेच्या समाज उन्नती मंडळात हा कार्यक्रम बुधवार दि 17 जुलै ला आषाढी एकादशीला संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात माजी महापौर प्रविणाताई ठाकूर,नारायण मानकर,डॉ. गणेश चंदनशिवे,यंगस्टारचे समनव्यक तथा माजी स्थायी समिती सभापती आजीव पाटील , वृन्देश पाटील साहित्य जल्लोषचे अध्यक्ष अँड्रू कोलासो , अशोक मुळे आणि समाज उन्नती मंडळाचे सुरेंद्र वनमाळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन वीरेंद्र पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश जाधव यांनी केले.

●पांडुरंग भजनाने दिंडी निघाली ; तर सायंकाळी अभंगात रंगून गेले वसईकर रसिक भक्तमंडळी●

यापूर्वी संध्याकाळी ४ वाजता वसई दिवाणमान येथील साई मंदिर ते समाज उन्नती मंडळ या कार्यक्रम स्थळापर्यंत वारकरी दिंडी ताल मृदूंग आणि भजनाच्या नामघोषात आणण्यात आली. . या दिंडीत परिवहन सभापती भरत गुप्तां ,माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, पुष्पां जाधव, वसई जनता बँकेचे नवनिर्वाचित संचालक मकरंद सावे ,वसई विकास बँकेचे माजी संचालक केवळ वर्तक, सुरेश ठाकूर,गजलकार ज्योती बालिगा,कवयत्री संगीत अर्बुने,प्रकाश पाटील आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. निडिका पूर्व पेठे यांनी सांगीतिक वारीची सुरवात केली . त्यानंतर सुरु झाला तो अखंड पणे नामाचा गजर विठ्ठलाच्या भक्तिरसाच्या अभंगांच्या वारीत कधी तुकाराम,कधी ज्ञानेशवर,मुक्ताई,सोपानदेव, नामदेव तर कधी चोखामेळा डोकावून जात होते. कार्यक्रमाची सुरुवातच जयजय रामकृष्ण हरी या मूलमंत्राने झाली.मग रूप पाहता लोचनी म्हणत वैष्णव रूप पाहण्यात दंग झाल्याचे दिसत होते. मग कधी यावरील विठूराया माझाचंदनाचा , पांडुरंग कांती दिव्य तेज तळपती म्हणत वित्थुला आळवीत होता. या दरम्यान माजी महापौर प्रवीण ठाकूर यांनी फर्माईश केलेले वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा सादर करण्यात आले. हरी भजनाविण काळ,तीर्थ विठ्ठल,रूप पाहता लोचनी,बोलावा विठ्ठल,पांडुरंग कांती,ताटी उघड ज्ञानेश्वर,सुंदर ते ध्यान , अरे अरे ज्ञाना झालासी पावन अबीर गुलाल,माझे माहेरपंढरी,खेळ मांडीयला अवघे गर्जे पंढरपूर अश्या एकापेक्षा एक अभंग गायक सिद्धेश जाधव, विशारद गुरव व गायिका पद्मजा पाटील, सुस्मिरता डवाळकर यांनी सादर करून रसिकांना मुग्ध केले कार्यक्रमाची सांगता परंब्रम्ह बेटी लागे या भैरवीने करण्यात अली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!