spot_img

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संवाद यात्रेचे भागीदार व्हा- नयन मोंढे, दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद पदयात्रेच्या पूर्वतयारीची बैठक

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संवाद यात्रेचे भागीदार व्हा- नयन मोंढे

●दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद पदयात्रेच्या पूर्वतयारीची बैठक

◆मिररवृत्त
◆अमरावती

पत्रकार संवाद यात्रा राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीचा बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे. त्यामुळं प्रत्येकाने ताकदीने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करून या ऐतिहासिक क्षणाचे नुसतेचं साक्षीदार नव्हता भागीदार व्हा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रा रविवार २८ जुलै रोजी नागपूर दीक्षाभूमी ते मुबंई मंत्रालयवर निघणार आहे. यात्रेच्या पूर्वतयारीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे बुधवार(ता.१७) रोजी पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, प्रा.मनिष भकाळे, विजय गायकवाड उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक शुभम मेश्राम यांनी केले.संचालन स्वप्नील सवाळे तर आभार अनिरुद्ध उगले यांनी मानले. बैठकीला मनीष जगताप,सागर तायडे,सागर डोगरे, गजानन मेश्राम, प्रशांत सुने, राजाभाऊ वानखडे, नकुल नाईक, पी एन देशमुख ,गजानन जीरापुरे, सचिन पाटील, शेषनाग गजभिये, संजय मोहोड, गोपाल नरे, विनोद इंगळे, सागर डोंगरे, संजय तायडे, इमरान खान, हिमांशू मेश्राम, विवेक दोडके, विजय सौदागर, रवींद्र फुले, आकाश सौदागर, नागेश उंबरकर, राजेंद्र ठाकरे, उज्वल भालेकर मीनाक्षी कोल्हे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य व विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

●हजारोच्या संख्येने दीक्षाभूमी येथे उपस्थित रहा- प्रवीण शेगोकार●
पत्रकार संवाद यात्रेचा २८ जुलै रोजी दीक्षाभूमी नागपूर येथून प्रारंभ करण्यात येणारं आहे. तरी सर्व तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने नागपूर येथील दीक्षाभूमी येथे उपस्थित राहावे. अमरावती शहरात पत्र पत्रकार संवाद यात्रेचे आगमन झाल्यानंतर विविध सामाजिक संघटना शैक्षणिक संस्था व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी यात्रेला समर्थन देऊन यात्रेच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार यांनी केले

●पत्रकारांनी एकजूट होऊन यात्रेत सहभागी व्हावे-प्रा.मनिष भकाळे●

पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी असून त्या सोडविण्यासाठी पत्रकार संवाद यात्रा राज्यभरातून पत्रकाराच्या समस्या घेऊन मंत्रालयात मांडणार आहे तेव्हा पत्रकार बांधवांनी एकजूट दाखवून संवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन प्रा मनीष भंकाळे यांनी केले.

●जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभागी व्हावे- विजय गायकवाड●

पत्रकारांच्या विविध समस्या घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सतत लढा देत आहे या आंदोलनात जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन विजय गायकवाड यांनी केले.

●पत्रकार संवाद यात्रेत सहभागी व्हा- मनीष जगताप●

पत्रकारांवर अन्याय अत्याचार झाल्यास सर्वप्रथम रस्त्यावर उतरणारे संघटना आहे. लढवय्या संघटनेच्या पत्रकार संवाद यात्रेत पत्रकारांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनीष जगताप यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!