spot_img

“विद्यार्थ्यांनो स्वतःची ओळख निर्माण करा” -सुधीर केने, भुयार सर एज्युकेअर येथे गुणवंतांचा सत्कार

“विद्यार्थ्यांनो स्वतःची ओळख निर्माण करा”-सुधीर केने

भुयार सर एज्युकेअर येथे गुणवंतांचा सत्कार

●मिररवृत्त
●अमरावती

आपल्यासमोर कोणी आदर्श आहे का हे शोधण्यापेक्षा स्वतः स्वतःची ओळख निर्माण करून दुसऱ्या समोर आदर्श बना असे आवाहन लेखक पत्रकार तथा शिक्षक सुधीर केने यांनी केले ते भुयार एज्युक्युअर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते.गेल्या 30 वर्षापासून यशाची उज्वल परंपरा असणारे भुयार सर एज्युक्येअर येथे मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक, पत्रकार ,लेखक ,समुपदेशक, प्रसिद्ध वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले सुधीर केने सर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुयार सर एज्युकेअरचे संचालक बंडोपंत भुयार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल बारबुदधे यांनी केले.याप्रसंगी केने सरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याबरोबरच एक चांगला माणूस होण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा कानमंत्र आपल्या मार्गदर्शनातून दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. शिवानी वानखडे, कु. अनुष्का खराटे, नहुश माथनकर, अंजन थर्डक, विराज अकोलकर, कु. पूर्वा पुनकर, कु.साची मुंदावणे अनुज पडोळे, आर्य साबळे, आदित्य गावंडे, कु.आर्या इंगळे, हर्ष बेलोकार ,अमर्त्य काकडे ,स्वराज डुकरे, कु.क्षितिजा नांदुरकर ,मंथन काळे, ईश्वर गादे, सोहम ढाकरे, शाहू भोरे, नील गादे कु.सावरी राऊत,कु. गुनिका पटेल, कौस्तुभ चौधरी,कु. श्रेया राठोड व शुभम जवंजाळ आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाला अकॅडमीचे सहशिक्षक डॉ. सिद्धांत भुयार, सौ.सविता भुयार,कु. पूनम कडू,कु. मयुरी फटिंग,कु. साक्षी रहाटे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री काळे यांनी, व आभार प्रदर्शन चैताली मॅडम यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!