वसई विरार शहर महापालिका नूतन मुख्यालय इमारतीत सुसज्ज ‘पत्रकार कक्ष’ मागणीसाठी वसई तालुका पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मिडिया संघाने घेतली आयुक्तांची भेट !
●तात्काळ अंमलबजावणीचे आयुक्तांनी दिले आदेश
◆मिररवृत्त
◆वसई
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नूतन मुख्यालय इमारतीत वसई तालुक्यातील पत्रकारांना सुसज्ज व सर्व सोयीसुविधायुक्त असा “पत्रकार कक्ष” मिळावा याकरीता वसई तालुका पत्रकार संघ आणि वसई विरार इलेक्ट्रॉनिक मिडिया संघ यांच्या पदाधिकारी-प्रतिनिधींनी आज दि 15 जुलै 2024 रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार (भा प्रा से ) यांची सकाळी ठीक 12. 30 वाजता त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना या महत्त्वपूर्ण मागणी संदर्भातले निवेदन दिले
याप्रसंगी आयुक्तांनी तालुक्यातील पत्रकारांना तात्काळ “पत्रकार कक्ष” देण्याबाबतीत अंमलबजावणीचे आदेश पालिका उपायुक्त नानासाहेब कामटे आणि बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रदीप पाचांगे आदी संबंधित अधिकारी वर्गास दिले
दरम्यान या महत्त्वाच्या मागणीसाठी गेलेल्या या शिष्टमंडळात वसई तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित, सचिव आशिष राणे तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुडाळकर,सचिव विजय गायकवाड , हनिफ पटेल,संदीप गायकवाड आदी उपस्थित होते