spot_img

स्व.व्दारकाबाई नागोरावसा गुल्हाने व स्व.नलिनीताई सोमेश्वरराव गुल्हाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ 27 ऑगस्टला होणार स्वर्ग रथाचे लोकार्पण

स्व.व्दारकाबाई नागोरावसा गुल्हाने व स्व.नलिनीताई सोमेश्वरराव गुल्हाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ 27 ऑगस्टला होणार स्वर्ग रथाचे लोकार्पण

●मिररवृत्त
●नांदगाव खंडेश्वर

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील गावात अंत्यसंस्कारासाठी शहरातील वैकुंठ धामापर्यंत जाताना मृतांच्या नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील कोणत्याच गावाात स्वर्ग रथ नसल्याने समस्या निर्माण होत होती. हीच समस्या लक्षात घेऊन तसेच रोड रस्ते अपघातात जखमी होणारे अपघात ग्रस्त रुग्नांना व गरजवंत गोरगरिब नागरिकांना 24 तास मरणोत्तर सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नांदगाव खंडेश्वर शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुऊद्देशिय संस्था,तसेच पिपल वेलफेअर रोड सेफ्टी असोसिएशन नांदगाव खंडेश्वर या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने हॉटेल सिद्धार्थ पॅलेसचे माध्यमातुन ऑक्सिजन सुविधेसह रुग्नवाहिका सेवा व शवपेटी सेवा काही महिन्यापासुन सुरु असुन त्यासोबतच आता नव्याने अद्ययावत स्वरूपाचा स्वर्ग रथ तयार करण्यात आला आहे. या स्वर्ग रथाचा लोकार्पण सोहळा दिनांक 27 ऑगस्ट रोजी संस्थेचे मार्गदर्शक सोमेश्वर नागोरावसा गुल्हाने याच्या हस्ते शहरातील समाजसेवक व ईतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्याचे ठरले आहे.
28 ऑगस्ट पासुन सदर स्वर्ग रथ सर्व समाजासाठी उपलब्ध असणार असुन विशेष म्हणजे सदर रथात साऊंड सिस्टिमसह सर्व सुविधा असल्याने वाजंत्रीची सुद्धा गरज पडणार नाही या निमित्य
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुऊद्देशिय संस्था नांदगाव खंडेश्वर चे अध्यक्ष – रुग्नसेवक राहुल सोमेश्वरराव गुल्हाने आपले मत व्यक्त केले की, नांदगाव खंडेश्वर शहरात यापुढेही सामाजिक सेवाभावी संस्थेचे माध्यमातुन समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा माझा मानस असुन नांदगाव खंडेश्वर शहरात भविष्यात यापेक्षा चांगले समाज उपयोगी उपक्रम सर्वांनी मिळुन राबविल्यास नांदगाव खंडेश्वर शहराची एक वेळगी ओळख निर्मान होऊन शहराचे विकास होण्यास वेळ लागणार नाही यासाठी शहरातील राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी बांधव व सामाजिक संघटनेने सहभागी होवून पुढाकार घ्यावा असे आवाहन केले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!