संत्रा प्रक्रिया प्रकल्प नांदगाव पेठ एमआयडीसीत सुरु करा- दिनकर सुंदरकर
◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ
विदर्भातील नागपूर अमरावती जिल्हा संत्रा उत्पादनसाठी प्रसिद्ध असून ऑरेंज सिटी म्हणून नागपूर अमरावती जिल्हाची ओळख जगात आहे.
तर अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून संत्रा उत्पादकांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकरिता संत्रा प्रक्रिया प्रकल्प नांदगाव पेठ येथे उभारन्यात यावा अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
संत्रा प्रक्रिया प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाला उत्तम दर मिळेल तसेच स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणे रोजगार मिळेल. तर संत्रा प्रक्रिया प्रकल्प जर स्थानिक नांदगाव पेठ येथील एमआयडीसीमध्ये उभारला गेला तर येथील शेतकरी आर्थिक संपन्न निश्चितच होतील त्यामुळे सरकारने नांदगाव पेठ एमआयडीसी येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्प निर्माण करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर यांनी केली आहे. सरकारने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणे महत्त्वपूर्ण आहे या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात संत्रा देश विदेशात ट्रान्सपोर्ट करता येईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.तरी सरकारने दखल द्यावी अशी मागणी दिनकर सुंदरकर सह संत्रा शेतकरी बांधव करीत आहे