spot_img

मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी अरविंद घोम,चिखलदरा तालुका कार्यकारिणी जाहीर

मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी अरविंद घोम

◆चिखलदरा तालुका कार्यकारिणी जाहीर

◆मिररवृत्त
◆अमरावती

मुख्याध्यापक संघाची चिखलदरा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये जीवन सोनखासकर यांची तालुका अध्यक्षपदी तर स्वा.श्री. अजाबराव काळे पाटील विद्यालय चुरणी येथील मुख्याध्यापक अरविंद घोम यांची कार्यकारी अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.मुख्याध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी झटत असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील मुख्याध्यापकांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
चिखलदरा तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी श्री.गुरुदेव तु.काळे विद्यालय, तेलखारचे मुख्याध्यापक सातपुते सर यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली.
कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी जिवन सोनखासकर,कार्यकारी अध्यक्षपदी अरविंद घोम,उपाध्यक्षपदी उमेश सुताने, जमील सर,सचिवपदी विजयेंद्र अतकरे,कोषाध्यक्षपदी सुरज गावंडे, सहसचिव सुरजाये सर,विलासराव उभाड -महिला सदस्य म्हणून वनिता मोहोड, चारुलता कदम,सदस्य म्ह्णून सुभाष रायबोले,प्रसिद्धी प्रमुखपदी अरविंद घोम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सभेचे कामकाज कार्याध्यक्ष अरविंद घोम यांनी पाहिले. उपस्थित सर्व मुख्याध्यापक चिखलदरा तालुका यांच्या उपस्थितीत
लोकशाही पद्धतीने चिखलदरा तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.सभेला सातपुते सर , नवनियुक्त अध्यक्ष जीवन सोनखासकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळ श्रीकृष्ण उभाड , दिलीप वानखडे, तरवले सर , येवले सर , हुड सर , वसंत वाघ , सुभाष रायबोले, भुयार सर, लबडे सर, सौ.मोहोड मॅडम, तथा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्व नवनियुक्त मुख्याध्यापक संघ कार्यकारिणी यांचे चिखलदरा तालुक्यातील उपस्थित मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले तथा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.उपस्थितांचे आभार वसंत वाघ यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!