spot_img

माझ्याशी फोनवर बोल,अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबाला संपवेन,एकतर्फी प्रेमातून युवकाने दिली जीवे मारण्याची धमकी

माझ्याशी फोनवर बोल,अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबाला संपवेन

◆एकतर्फी प्रेमातून युवकाने दिली जीवे मारण्याची धमकी

◆पोलिसांची भूमिका संशयास्पद, अदखलपात्र गुन्ह्याची केली नोंद

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

ओळखीतील असलेल्या युवकाने एकतर्फी प्रेमातून युवतीला व तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार युवतीने नांदगाव पेठ पोलिसांत केली आहे. पाठलाग करणे, फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देणे यामुळे महाविद्यालयीन युवती व तीचे कुटुंबीय दहशतीत वावरत असल्याने याप्रकरणी युवतीने व तीच्या कुटुंबीयांनी अखेर नांदगाव पेठ पोलिसांत तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी गंभीर प्रकाराची दखल न घेता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांची भूमिका संशयास्पद असून त्या युवकावर कोणतीही कार्यवाही न केल्याने भयभीत युवतीला व कुटुंबियांना आल्यापावली परत जावे लागले.
सावर्डी येथील एका वीस वर्षीय युवतीची सोमेश्वर जाधव (२४) सालोरा धोत्रा या युवकाशी ओळख होती. त्यांचे फोनवर बोलणे सुद्धा व्हायचे मात्र अलीकडे सोमेश्वर फोनवर विचित्र बोलत असल्याने युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले.त्यामुळे तो ईतर नंबर वरून युवतीच्या मोबाईल वर फोन करून माझ्याशी बोल अन्यथा तुला व तुझ्या कुटुंबियांना समवेन अश्या जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला लागला.भीतीपोटी तिने गाव सोडले व जावयाच्या घरी राहायला गेली तर जावयाने एकदिवस त्याचा फोन उचलून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर जावयाला सुद्धा त्याने तिला माझ्याशी बोलायला सांग नाहीतर तुला सुद्धा मारेल अशी धमकी दिली.
युवती आणि तिचे वृद्ध आईवडिल या प्रकारामुळे भयभीत झाले असून अखेर त्यांनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठून १५ जून रोजी सोमेश्वर जाधव विरोधात तक्रार दिली व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद करून या कुटुंबाला परत पाठवले. सोमेश्वर जाधव याने रविवारी सकाळी फोन करून संध्याकाळ पर्यंत मला पैसे दे अन्यथा तुझे फोटो एडिट करून व्हायरल करेल अशी धमकी सुद्धा दिली.त्यामुळे व्यथित झालेले कुटुंब त्या युवकांवर पोलीस कार्यवाही होण्याची प्रतीक्षा करत आहे मात्र पोलीसांनी तक्रार देऊन दोन दिवस उलटल्यानंतर सुद्धा त्या युवकाला ठाण्यात हजर सुद्धा केले नाही हे विशेष!
सदर युवती आणि तिचे कुटुंब जीवे मारण्याच्या धमकीने आजही दहशतीत वावरत असून कुठे जावं आणि कुणाला न्याय मागावा अश्या मनस्थितीत आहे. दुसरीकडे युवती सुद्धा या प्रकाराने भयभीत झाली असून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!