spot_img

ओम रंगाचार्य युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डला रिसर्च सायंटिस्ट म्हणून नियुक्त

अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा..

ओम रंगाचार्य युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डला रिसर्च सायंटिस्ट म्हणून नियुक्त

◆मिररवृत्त
◆अमरावती

जगात नावलौकिक असणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथे रिसर्च सायंटिस्ट म्हणून येथील ओम देवेंद्र रंगाचार्य याची नियुक्ती झाल्याने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो स्कॉटलँड (यु के) येथे एम.एस शिक्षण पूर्ण केल्यानंतर ओम ला युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथे रिसर्च सायंटिस्ट म्हणून नियुक्ती मिळाली.
विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले देवेंद्र रंगाचार्य व सौ अनुराधा यांचा मुलगा ओम याने प्राथमिक शिक्षण अमरावतीमध्ये पूर्ण केल्यानंतर एमआयटी पुणे येथे बायो मेडिकल इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये प्राविण्यासह मास्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी प्राप्त केली.नुकतेच २०२३ मध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी ग्लोबल बायोटेक लिडर्स मध्ये ओम रंगाचार्य यांची निवड झाली होती त्यानंतर लगेच नवीन वर्षात युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथे रिसर्च सायंटिस्ट
म्हणून नियुक्ती झाली.
अमरावतीच्या लौकिकात भर टाकणारी ही बाब असून ओम रंगाचार्य याने आपले ध्येय निश्चित करून आपण मोठे यश संपादन केल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. माझ्या यशात माझ्या कुटुंबियांची मोलाची साथ असल्याचे देखील ओम ने सांगितले. ओम च्या या यशाबद्दल जिल्ह्यातुनच नव्हे तर राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!