spot_img

रॉयल किड्स स्कूल अमरावती येथे स्नेहसंमेलन

रॉयल किड्स स्कूल अमरावती येथे स्नेहसंमेलन

◆मिररवृत्त
◆अमरावती

येथील स्थानिक गोपाल नगर येथील रॉयल किड्स स्कूलचे स्नेहसंमेलन मोठया थाटात आणि उत्साहात पार पडले.भारतीय संस्कृती, देशभक्ती, लोककला, पोवाडा. बेटी बचाओ. बेटी पढाओ. शिक्षण. देशाच्या समस्या, लोकनृत्य,इत्यादी विविध रंगीबेरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोधी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा रॉयल किड्स स्कूलचे संचालक प्रफुल्ल वाकोडे होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिवसेना नेते संजय शेटे, भुसावळ रेल्वे मंडळ सदस्य अमित मंत्री,वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अभिजित देशमुख आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
सोनाली निघोट यांनी प्रास्ताविकेतून स्नेहसंमेलनाची रूपरेषा विषद केली.शाळेतील मुलानी आपले नृत्य कौशल्याने व स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलन करून झाली. शिक्षिका सोनाली सूर्यवंशी आणि अंकिता वितोंडे यांनी आलेल्या पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.भारतीय संस्कृतीच्या परंपरेने आलेल्या अतिथी यांचे शाल श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रगती सरकटे यांनी आपल्या मनोगनातून कार्यक्रमाच्या आयोजनात सर्व शाळेचा कर्मचारी वर्ग आणि पालकांनी अतिशय परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे तोंडभरून कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारांची उपस्थितांनी मनापासून दाद दिली. शाळेच्या शिक्षिका योगिता महल्ले यांची जिल्हा परिषद यवतमाळ येथे शिक्षण सेवक म्हणून नेमणूक झाली त्यानिमित्ताने शाळेच्या संपूर्ण टीम कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.वेलकम डान्स, लावणी, साऊथ डान्स, जुने गाणे रिमिक्स देशभक्ती, इमोशनल. शिवकालीन पोवाडा यावर चिमुकल्यांनी बहारदार एकापेक्षा नृत्य सादर केलेत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सोनाली सूर्यवंशी आणि अंकिता वितोंडे आणि आभार प्रदर्शन योगिता महल्ले यांनी मानले. कार्यक्रमाला पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक. श्रीमती प्रगती सरकटे,पूजा इंदूरकर,योगिता महल्ले, अंकिता वितोंडे, प्रणाली मांजरे,अवनी वानखडे, योगिता मानमोडे, राणी खंडार आदींनी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!