spot_img

मद्यधुंद युवकाच्या भरधाव कारची दुभाजकाला धडक,कार पलटी , इर्विन चौकात मध्यरात्रीचा थरार

मद्यधुंद युवकाच्या भरधाव कारची दुभाजकाला धडक,कार पलटी

◆इर्विन चौकात मध्यरात्रीचा थरार

◆दुभाजकावर झोपलेले पाच जण सुदैवाने बचावले

◆कोतवाली पोलिसांची थातूर मातूर कारवाई

◆मिररवृत्त
◆अमरावती

कॅम्प परिसरातुन इर्विन चौकाकडे येणाऱ्या मद्यधुंद युवकाचे भरधाव वाहन दुभाजकाला धडकल्याने इर्विन चौक स्थित सुरज हॉटेल समोर रविवारी रात्री ११:४५ वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडला. वाहन भरधाव असल्याने मद्यधुंद युवकाकडून कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला मात्र सुदैवाने दुभाजकांवर झोपलेले पाच जण थोडक्यात बचावले.अचानक घडलेल्या या घटनेने अनेकांनी मृत्यू डोळ्यासमोर बघितला होता.आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी समयसूचकता दाखवत पलटी झालेली कार पूर्ववत करून कोतवाली पोलिसांना याबाबत सूचना दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून वाहन चालकाला ताब्यात घेतले व काही वेळातच पोलीसांनी आरोपी चालकावर ड्रंक अँड ड्राईव्ह कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला पुन्हा अपघात करण्यासाठी मोकळे सोडून दिले.J

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,शुभम अशोकराव उभाड (२९) रा. अष्टविनायक अपार्टमेंट, जुना बायपास रोड अंबिकानगर, रुख्मिनी नगर अमरावती हा युवक रात्री ११:४५ च्या दरम्यान एमएच-२९-एडी-५३७७ या कार ने मद्यधुंद अवस्थेत भरधाव आणि बेदरकारपणे कॅम्प परिसरातून इर्विन च्या दिशेने कार चालवत असतांना इर्विन चौकात त्यांचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन पलटी झाली. दुभाजकावर झोपलेले पाच जण तर यामध्ये सुदैवाने बचावले मात्र इर्विन चौकात उभे असणारे दहा ते बारा जण सुद्धा या अपघातात बचावले.



कार मधील चालक एवढा बेधुंद होता की अपघातानंतर सुद्धा त्याला काहीच वाटले नाही.उलट मदत करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत होता.नागरिकांनी कार पूर्ववत करून त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र पोलिसांनी रात्री त्याच्यावर कलम १८५ ड्रंक अँड ड्राईव्ह अन्वये गुन्हा दाखल करून त्याला पुढील अपघातास मोकळे केले. त्याठिकाणी उपस्थित नागरिकांनी जीव मुठीत घेऊन आपली आपबीती सांगितली, महत्वाचे म्हणजे अपघातस्थळी डीसीपी गणेश शिंदे,नाईट डीवो सुमित सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश सपकाळ, दीपक श्रीवास, मंगेश दिधेकर,मो. समीर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते अपघाताची भीषणता त्यांनी डोळ्यादेखत बघितली मात्र कोतवाली पोलिसांनी अश्या बेधुंद युवकांचा सुंदरी ने पाहुणचार करण्याऐवजी त्याच्यावर दया दाखवून त्याला घरी रवाना केले. विशेष म्हणजे कारचे आरटीओ तपासणी आवश्यक असतांना ती सुद्धा केली नसल्याने सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी पोलीस आयुक्त यांनी चौकशी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!