spot_img

   छञपती शिवराय जगातील सर्वोत्कृष्ट राजा…!,तालुकास्तरीय शिव वक्तृत्व स्पर्धेत बाल वक्त्यांनी मांडले विचार

   छञपती शिवराय जगातील सर्वोत्कृष्ट राजा…!

◆तालुकास्तरीय शिव वक्तृत्व स्पर्धेत बाल वक्त्यांनी मांडले विचार

◆दिव्यांग मुलींचाही सहभाग

◆मिररवृत्त

◆अमरावती

छञपती शिवरायांनी आपल्या संपूर्ण जीवनात अखिल विश्वाला हेवा वाटावा अशी कामगिरी केली. त्यांच्यात उत्तम संघटक, प्रजाहितदक्ष राजा, परस्त्री आदर, उत्तम स्थापत्य अभियंता, उत्कृष्ठ पुत्र, पती व पिता अशा अनेकविध भूमिका त्यांनीं योग्य पद्धतीने निभावल्या. त्यांच्या शौर्य,पराक्रम, धाडसाला तोड नाही म्हणून ते जगातील सर्वोत्कृष्ट राजे ठरतात.असे ठामपणे बाल वक्त्यांनी तालुका शिव वक्तृत्व स्पर्धेत मांडले.अखिल तालुका शिवजयंती महोत्सव समिती, सुमनबाई हरडे बहु. संस्था, गो. सी टोम्पे महाविद्यालय आयोजीत व संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी संयोजीत तालुकास्तरीय शिव वक्तृत्व स्पर्धा प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली

 


शिवजयंती महोत्सव अंतर्गत ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या स्पर्धेत तालुक्यातून व बाहेर तालुक्यातून एकुण 45 विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घातला. सर्वच विषयांवर विद्यार्थी सुंदर बोलले.
त्यावेळी प्रथम क्रमांक जी आर काबरा विद्यालयाची विद्यार्थीनी दिया मोहोड, द्वितीय क्रमांक
श्रीमती द्वारकाबाई तिवसेकर विद्यालय, सोनोरी ची कृष्णाई काळे, तृतीय क्रमांक आर्या मोहोड, ज्ञानोदय विद्यामंदिर चांदूरबाजार प्रोत्साहनपर बक्षीस शंकर विद्यालय ची पारमिता मोटघरे, शिवराव विद्यालयाची विद्यार्थीनी ईश्वरी गांजरे हिला मिळाले. स्पर्धेचे उद्घाटक गो. सी टोम्पे महाविद्यालयं चे प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर स्पर्धेचे मुख्य संकल्पक डॉ तुषार देशमुख,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश संघटक प्रा. मनाली तायडे, युवा वक्ता पल्लवी चौधरी, साक्षी भेले कोरडे, रेखा देशमुख, स्पर्धेचे संयोजक प्रा मयूर चौधरी, समन्वयक निखिल काटोलकर, अंकित हरडे, प्रतिक देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी ॲड. सुमित चऱ्हाटे, अभिजित मोहोड, अक्षय पांडे यांनी परिश्रम घेतले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!