spot_img

ब्लॅक संडे, अमरावतीच्या क्रिकेटपटूंवर काळाचा घाला ,शिंगणापूर फाट्यावर टँकर व ट्रॅव्हलर चा भीषण अपघात,४ क्रिकेटपटू ठार

 ब्लॅक संडे, अमरावतीच्या क्रिकेटपटूंवर काळाचा घाला
  • ◆शिंगणापूर फाट्यावर टँकर व ट्रॅव्हलर चा भीषण अपघात,४ क्रिकेटपटू ठार

◆अमरावती वरून यवतमाळ येथे क्रिकेट खेळण्यासाठी निघाले होते खेळाडू
◆मिररवृत्त
◆शरद देवगिरीकर
            ●शिंगणापूर ऑन द स्पॉट रिपोर्ट●
अमरावती येथून यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्याकरिता निघालेल्या क्रिकेटपटूंच्या ट्रॅव्हलरला शिंगणापूर फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकर ने जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात अमरावती मधील ४ क्रिकेटपटू जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. घटनेत ईतर ८ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
    याबाबत सविस्तर असे कि, आज सकाळी ८  वाजताच्या सुमारास क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी तरुणांचा एक समूह  ट्रॅव्हलर क्र. एम एच २७,बी के.-१७५५ ने अमरावती येथून यवतमाळ कडे निघाला होता दरम्यान ट्रॅव्हलर शिंगणापूर फाट्यावर पोहचताच विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टँकर क्र. जि जे ३९ टी ९३५३ ने  ट्रॅव्हलर ला जबर धडक दिली यामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण गंभीर असल्याची माहिती आहे.
 अमरावती जिल्ह्यातीत नांदगाव खंडेश्वर महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. या महामार्गावरील अपघातांची संख्या वाढतच आहे. रस्त्यावर खड्ड्यांची संख्या देखील जास्त आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्रर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल सोंळके पोलीस उपनिरिक्षक तुळजेवार,पोलीस कर्मचारी रंजित गवई, अभिजित अंबाळकर, किशोर अढाऊ,चालक गोपाल तायडे चालक मनोहर सह महामार्ग पोलीस पथक  नांदगाव खंडेश्वर येथील पिपल वेलफेअर रोड सेफ्टी असोसिएशन नांदगाव खंडेश्रर या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुग्णसेवक राहुल गुल्हाने तसेच  युवा सेना जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी तात्काळ आसपासचे परिसरातील रुग्णवाहिका बोलावुन उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना नांदगाव- खंडेश्वर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातातील जखमी नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमरावती शहरातील रिम्स हॉस्पिटल मध्ये आता या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आहे.घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!