spot_img

अमरावती येथे 24 व 25 फेब्रुवारी ला पहिली जागतिक धम्म परिषद,तथागत गौतम बुद्धाच्या मूळ अस्थीचे दर्शन , लाखो बौद्ध उपासक उपासिका लावणार हजेरी

अमरावती येथे 24 व 25 फेब्रुवारी ला पहिली जागतिक धम्म परिषद

◆तथागत गौतम बुद्धाच्या मूळ अस्थीचे दर्शन
◆लाखो बौद्ध उपासक उपासिका लावणार हजेरी

◆मिररवृत्त
◆अमरावती

अमरावती शहरात प्रथमच जागतिक धम्म परिषदेचे दि.24 व 25 फेब्रुवारी 2024 ला सायन्सस्कोर मैदान येथे आयोजन केले आहे. या धम्म परिषदेला भारत, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश,थायलंड या देशातील प्रज्ञावंत महाथेरो, थेरो, थेरी भंते उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे श्रीलंका येथून तथागत गौतम बुद्धांच्या मूळ अस्थी येणार असल्याची माहिती परियत्ती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आयोजक प्रमोद इंगळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.तथागथ गौतम बुद्ध यांच्या मूळ अस्थींची पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून निघणार आहे. हि यात्रा डॉ.आंबेडकर चौक पासून जयस्तंभ चौक ते राजकमल चौकातून सायंन्सस्कोर मैदानात पोहचेल, या यात्रेत अनेक भन्तेगण व हजारो धम्म उपासक व उपासिका शुभ्र वस्त्रात उपस्थित राहतील.परिषदेच्या पहिल्या सत्रात परिषदेचे प्रमुख उद्दघाटक म्हणून आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहतील तसेच अध्यक्ष म्हणून भंते अभयपुत्त महाथेरो राहतील.या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिकारी सौरभ कटियार,पोलीस आयुक्त नवीनचंद रेड्डी व उपविभागीय अधिकारी अनिल भटकर हे राहतील.
दुसऱ्या सत्रात प्रज्ञावंत महाथेरो गुनानाजी भन्ते (श्रीलंका), भन्ते तेजनीया महाथेरो (म्यानमार), अभयपुत्त महाथेरो (छत्रपती संभाजी नगर) भन्ते अमोल बोधी महाथेरो, भन्ते ईब्बागामूवे थेरो (श्रीलंका), मानापाहा सुबोध्दिवंशा थेरो (श्रीलंका) धम्मदेशना करतील.त्यानंतर रात्री 10 वाजता महापरित्राण पाठ होईल.
25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता देश विदेशातील भन्ते ज्ञानजोती महाथेरो, भन्ते इंडवनसा महाथेरो, भन्ते सुगतवंस महाथेरो, भन्ते बुद्धगोश महाथेरों, सुगतवन्सा महाथेरो,भन्ते शाक्य पुत्र राहुल (पैठण),आदी भन्ते उपासक उपसिकांना धम्मदेशना मार्गदर्शन करतील, त्यानंतर दुपारी 1 च्या सत्रात देश विदेशातील भन्ते धम्मदेशना करतील.तसेच ठीक दुपारी 4 वा.तथागतांच्या पावन अस्थींचे दर्शन सुरु होईल,व समारोपीय समारंभ होईल. सायंकाळी 8 वा बुद्ध भिम गीतांच्या कार्यक्रमासोबत धम्म परिषदेचा समारोप होईल.
या जागतिक धम्म परिषदेसाठी परियत्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंगळे, सचिव वंदना तायडे, देवेंद्र ढोके,राजूभाऊ बानखडे, किरण गुडदे, मनीष साठे, बंटी रामटेके, जयंत इंगळे, तृप्ती मेश्राम, प्रशांत गवई, अनिता सोमकुवर, जोशना बोरकर, साहेबराव वानखडे, रुपेश गवई, चंद्रमणी गणवीर, शीतल शिरसाट, गुणवंत बनसोड, हर्षा तायडे, अनंत वासनिक, मनोज छापानी, नितीन दामले, नंदू कीर्तन,युवराज गजभिये यांच्यासह पदाधिकारी व सर्व कार्यकारी मंडळ व जागतिक धम्म परिषद कृती समिती सहकार्य करणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.
पत्रपरिषदेला प्रमोद इंगळे यांचे सह भन्ते गिरमानंद,भन्ते शिलरत्न किरण गुढधे,तृप्ती मेश्राम,जगदीश गोवर्धन,वंदना तायडे, साहेबराव वानखडे,प्रशांत गवई,राजेश वानखडे,सनी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!