spot_img

अजाबराव काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चुरणी येथील प्राचार्यपदी अरविंद घोम

अजाबराव काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चुरणी येथील प्राचार्यपदी अरविंद घोम

●मिररवृत्त
●चिखलदरा

स्वातंत्र्य संग्राम सैनिक शिक्षण संस्था, कुष्टा (बु) व्दारा संचालित स्वातंत्र्यवीर श्री.अजाबराव काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चुरणी येथील प्राचार्यपदी अरविंद घोम यांची नियुक्ती करण्यात आली.३१ मार्च रोजी रवींद्र लहाने यांची सेवासमाप्ती झाल्यामुळे रिक्त ठिकाणी अरविंद घोम यांच्याकडे प्राचार्यपदाची धुरा देण्यात आली.
३१ मार्च रोजी रवींद्र लहाने हे प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील नागरिक बलराम वर्मा यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख संस्थेचे सचिव सुरेंद्र काळे,तसेच परिसरातील सर्व जिल्हा परिषद, व खासगी संस्था चे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक हे उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त रविंद्र लहाने तथा सौ.वर्षा रवींद्र लहाने यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार व निरोप समारंभा नंतर संस्था सचिव सुरेंद्र काळे यांनी अरविंद घोम यांची प्राचार्य पदावर नियुक्तीची घोषणा करत त्याठिकाणी नियुक्ती पत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. याप्रसंगी बोलताना घोम यांनी हा माझा सन्मान नसुन विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान असल्याचे म्हटले.
या कार्यक्रमाला पत्रकार मंगेश तायडे, नागेश मुंडे, प्रविण येवले, मारोती पाटणकर, आशिष निंबुरकर, विनोद अलोकार, संदीप अलोकार हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद घोम यांनी केले.
कार्यक्रमाला अनिल कोल्हे, राजेश वर्मा, गाणुजी बेठेकर, अनिल गायकी, उमेश सुताने, प्रविण ठाकरे, देशमुख सर, कानेरकर सर , किशोर सोलव दिवाकर अष्टूणकर यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी किशोर बोकडे, प्रमोद मुंदाने, देवेंद्र भोरे भिमराव खंडारे, संजय काळे, विठ्ठल मांगे, रमेश धोटे, सुनिल भास्कर, दीपक घोम, वासुदेव अलोकार, अरुण भामोद्रे, जोगी बेठेकर तथा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!