spot_img

चुरणी मधील’त्या’वृद्धाच्या घराच्या जागेचा प्रश्न कधी सुटणार?

चुरणी मधील’त्या’वृद्धाच्या घराच्या जागेचा प्रश्न कधी सुटणार?

◆आमसभेत होणाऱ्या निर्णयाकडे लागले गावकऱ्यांचे लक्ष

◆मिररवृत्त
◆चुरणी

अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील चुरणी गावातील प्रश्न सोडवण्यासाठी ग्राम सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.चुरणी गावात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत.त्यावर ग्रामसभेत काय चर्चा केल्या जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ग्रामसभेत ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांसह गावातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान गावातील एका निराधार वृद्धाच्या घराच्या जागेवर चक्क रोड बनवल्याचं उघड झालं आहे.यावर ग्रामपंचायतने मागील अनेक वर्षांपासून तोडगा काढलेला नाही. ग्रापंचायतने बेघर केलेल्या वृद्धाला घर कधी मिळणार? असा सवाल आता नागरिक करत आहेत. या ग्रामसभेत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!