spot_img

अंबानगरीत हजारो भाविकांनी केले विजयग्रंथाचे सामूहिक वाचन शिवसेनेचे आयोजन,महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता

अंबानगरीत हजारो भाविकांनी केले विजयग्रंथाचे सामूहिक वाचन

शिवसेनेचे आयोजन,महाप्रसादाने पारायण सोहळ्याची सांगता

◆मिररवृत्त
◆अमरावती

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या श्री विजयग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या हजारो गजानन भक्तांनी उस्फूर्तपणे सहभागी होत विजयग्रंथाचे सामूहिक वाचन केले. तब्बल सात तास चाललेल्या सोहळ्याची सांगता गजाननाच्या जयघोषात महाप्रसादाने झाली.
शिवसेना अमरावती जिल्हा शाखेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचा एक भाग म्हणून 25 जानेवारी रोजी गुरुवारी साईनगर स्थित बेनाम चौकातील प्रांगणात भव्य दिव्य अशा श्री विजय ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या प्रारंभी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे ,माजी खासदार अनंत गुढे,, माजी मंत्री जगदीश गुप्ता , आमदार प्रदीप वडनेरे , एडवोकेट आर बी अटल , नितीन वाट ,नांदेड़कर काका, शिवसेना पश्चिम विदर्भ महिला आघाडी समन्वयक आसावरीताई देशमुख ,जिल्हा संघटिका ज्योतीताई अवघड, मनीषाताई टेंबरे ,वर्षाताई भोयर ,प्रतिभा बोपशेट्टी ,माजी नगरसेवक प्रशांत वानखडे, दिनेश बूब,राजू भाऊ महल्ले ,धनंजय बंड,सोहळ्याचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज ,संत गजानन महाराज ,बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सोहळ्याचे आयोजक सुनील खराटे यांनी उपस्थित मान्यवर व भाविक भक्तांचे स्वागत करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकातून विशद केली .त्यानंतर पारायण वाचक पुणे येथील डॉ.गजानन खासनीस यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.पूजा, मंत्रोच्चार, शंखनाद, प्रार्थना आदी विधी आटोपल्यानंतर श्री विजयग्रंथ वाचनास प्रारंभ झाला .डॉक्टर खासनीस यांनी आपल्या अमृतवाणीतून मुखोदत्त विजय ग्रंथाचे वाचन केले. सोबतच उपस्थित हजारो गजानन भक्तांनी विजय ग्रंथाचे वाचन केले. दोन टप्प्यात पार पडलेल्या पारायण सोहळ्याची सांगता आरती व महाप्रसादाने झाली .त्यानंतर उपस्थित हजारो भाविक भक्त व अमरावतीकरांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .पारायण सोहळ्यासाठी भव्य दिव्य असा सभामंडप उभारण्यात आला होता तसेच पारायण करणाऱ्या भाविक भक्तांसाठी चहा,पाणी ,फराळ आदींची व्यवस्था कार्यक्रमस्थळी आयोजकांमार्फत करण्यात आली होती . यावेळी माजी नगरसेविका अर्चनाताई धामणे, जयश्री कुरेकर ,राजश्री जटाळे ,प्रकाश टेटू,विजय खंडारे आदी उपस्थित होते. तब्बल सात तास चाललेल्या या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त शिवसैनिक व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .

◆मंदिर संस्थान अध्यक्ष व विश्वस्तांचा सत्कार◆

श्री विजयग्रंथ सामुहिक पारायण सोहळ्याच्या शेवटी अमरावतीमधील विविध मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त सर्वश्री भागवताचार्य पांडुरंग कट्यारमल ,किशोर वडनेरे ,जयंत दलाल ,अजयराव जगताप ,ज्योतीताई कराळे ,मंगलाताई कावरे,पवार साहेब, शरद दातेराव यांचा विजय ग्रंथ वाचक डॉक्टर गजानन खासनीस आणि कार्यक्रमाचे आयोजक सुनील खराटे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रमोद कराळे गुरुजी यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!