spot_img

बावीस हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ,संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप

बावीस हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

■संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

संत काशिनाथ महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्य २२ जानेवारी रोजी काशिनाथ धाम याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तब्बल बावीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.हभप श्री.केशवदादा उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली.
१५ ते २२ जानेवारी दरम्यान संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.काशिनाथ धाम येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले.संत काशीनाथ महाराज समाधीस्थळी फुलांची आरास तसेच मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासून काल्याच्या किर्तनासाठी भाविकांची गर्दी जमली होती.१ वाजता महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली सात वाजेपर्यंत तब्बल बावीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाप्रसाद वितरण करण्यासाठी गावातील भाविक तसेच युवक मंडळींनी अथक परिश्रम घेतले. संत काशीनाथ महाराज संस्थानच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने महाप्रसाद वितरण व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही.संत काशीनाथ बाबा ऑटो युनियनच्या चालकांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले.काशिनाथ धाम ला सोमवारी यात्रेचे स्वरूप आले होते.

■लेकी आल्या माहेरी…■

संत काशीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्य सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावाचा मोठा उत्सव असल्याने या उत्सवाला लेकी माहेरी आल्या होत्या. कामानिमित्त बाहेरगावी असणारे नागरिक सुद्धा या धार्मिक कार्यात सहभागी झाले होते.

■’काशिनाथ धाम’ कायम व्हावा!■

दिवसेंदिवस मोठा होणारा हा उत्सव पहिल्यांदा नाफडे पेट्रोलपंप नजीक नवीन जागेत पार पडला. गावकऱ्यांनी या जागेची मागणी केली असून याठिकाणी काशिनाथ धाम कायम व्हावे अशी भाविकांनी यावेळी भावना व्यक्त केली.तर दरवर्षी उत्सव याच ठिकाणी होईल आणि शासकीय प्रक्रिया करून आपण ही जागा संत काशिनाथ धाम साठी कायम करू असा आशावाद संत काशीनाथ महाराज संस्थानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!