spot_img

उद्या संत काशिनाथ बाबा पुण्यतिथीनिमित्य महाप्रसाद

उद्या संत काशिनाथ बाबा पुण्यतिथीनिमित्य महाप्रसाद

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

संत काशिनाथ बाबा यांच्या १८ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा उद्या समारोप होणार आहे. हभप श्री. केशवदादा उकळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संत काशिनाथ धाम याठिकाणी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भागवताचार्य हभप केशवदादा उकळीकर यांच्या संगीतमय भागवतकथेचा भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने लाभ घेतला.
उद्या सोमवारी सकाळी ९ ते १२ दरम्यान हभप केशवदादा उकळीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. किर्तनानंतर दुपारी १२ ते ५ दरम्यान काशिनाथ धाम येथे महाप्रसाद वितरण होणार आहे. पंचक्रोशीतील जवळपास पंचविस हजार भाविकांची या महाप्रसादाला उपस्थिती असणार आहे. संत काशिनाथ महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला सात दिवस भाविक भक्तांची गर्दी जमली होती.भाविक भक्त तसेच गावकरी मंडळींनी या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संत काशिनाथ बाबा संस्थान विश्वस्त, ग्रामस्थ व तरुण मंडळींनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!