spot_img

संत काशिनाथ महाराजांची भूमी अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे केंद्र- आ.यशोमती ठाकूर ,राममंदिर,संत काशिनाथ देवस्थान, संत काशीनाथ धाम येथिल घेतले दर्शन

संत काशिनाथ महाराजांची भूमी अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे केंद्र- आ.यशोमती ठाकूर

■राममंदिर,संत काशिनाथ देवस्थान, संत काशीनाथ धाम येथील घेतले दर्शन

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

नांदगाव पेठ ला संतपरंपरेचा वारसा आहे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सुद्धा पदस्पर्श या गावाला लाभले आहेत.संत काशीनाथ महाराज यांचे वास्तव्य याठिकाणी लाभल्याने ही भूमी अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे केंद्र ठरत असल्याचे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्य काशिनाथ धाम येथील भागवत कथा कार्यक्रमात केले.तरुण, वृद्ध, महिला भगिनी शिवाय बालगोपाळ या धार्मिक महोत्सवात एकत्र येत असल्याने आपल्या संस्कृतीचे एकप्रकारे आपण जतन करत आहोत. त्यामुळे ही ऊर्जा घेऊन संतांचे विचार आणि संत परंपरा जोपासण्याची जबाबदारी आपली असून प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे असेही त्या यावेळी बोलल्या.
संत काशिनाथ महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्य १५ जानेवारी पासून काशिनाथ धाम येथे भागवत सप्ताह सुरू आहे.रविवारी आ. यशोमती ठाकूर यांनी नांदगाव पेठ येथील राममंदिर, संत काशीनाथ महाराज समाधीस्थळ तसेच काशिनाथ धाम येथील भागवत सप्ताहाला भेट देऊन दर्शन घेतले. येथील ऐतिहासिक असलेल्या राममंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन याठिकाणी आ. यशोमती ठाकूर यांनी महाआरती केली.त्यांनतर काशिनाथ धाम येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहाला भेट देऊन त्याठिकाणी व्यासपूजा व महाआरती केली.भागवताचार्य हभप श्री. केशवदादा उखळीकर महाराज यांचेही आशीर्वाद आ. ठाकूर यांनी घेतले. त्यांनतर भाविकांशी देखील त्यांनी संवाद साधला.
संत काशिनाथ बाबा संस्थांनच्या वतीने यावेळी यशोमती ठाकूर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कृ.उ.बा.स.सभापती हरीश मोरे, पं.स.अमरावतीचे माजी उपसभापती बाळासाहेब देशमुख, राजेश बोडखे,सरपंच कविता डांगे,प्रशांत काळबांडे, ऍड अमित गावंडे, विनोद डांगे, शशी बैस, विभाताई देशमुख, शिल्पाताई महल्ले,सुनंदा केचे, सतीश गोटे, वीरेंद्रसिह जाधव, चेतन जवंजाळ, मुकुंद पांढरीकर मंगेश आवारे, ज्ञानेश्वर बारस्कर,सुमित कांबळे,भाऊराव कापडे अनिल कापडे,विजय महल्ले ,दिलीप सोनोने ,पंकज देशमुख ,नंदू कुकडे, बंडू भाऊ पोहकार, दिलीप केणे, प्रवीण मनोहर,अल्केश काळबांडे, चंद्रकांत राऊत, राजेश कोठे, दिनेश धर्मे, सतीश धर्मे,मनीष बोडखे, अविनाश यावले, दिनेश पोकळे, मयूर सदावर्ते ,राजू आमझरे यांचेसह असंख्य कार्यकर्ते व भाविकभक्त उपस्थित होते.

■भंपकबाजी पेक्षा कार्याला महत्व द्या!■

ही जागा क्रीडा संकुलसाठी राखीव असून येथील संरक्षक भिंतीसाठी निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे तो निधी परत न जाऊ देता संरक्षक भिंत बांधून घ्या, भक्तांची इच्छा असेल तर याठिकाणी काशिनाथ धाम बनणारच यात तिळमात्र शंका नाही.ही जागा काशिनाथ धाम ला मिळण्यासाठी योग्य कागदपत्रांचा पाठपुरावा करावा लागेल, आणि त्यासाठी माझी सर्व काशिनाथ भक्तांना साथ असेल त्यामुळे या धार्मिक व्यासपिठावरून भंपकबाजी करण्यापेक्षा कार्याला महत्व द्या असा टोलाही आ. यशोमती ठाकूर यांनी लगावला.

■प्रेम,करुणा आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री राम■

२२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आ. यशोमती ठाकूर यांनी रविवारी नांदगाव पेठ येथील पुरातन श्रीरामचंद्र मठ येथे जाऊन श्री रामाचे दर्शन घेत महाआरती केली.राम प्रत्येकाच्या मनात विराजमान आहेत, प्रेम, करूणा आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री राम आहेत.प्रत्येकाने त्यांचे आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे असेही त्या यावेळी बोलल्या.यावेळी श्रीरामचंद्र मठाचे विश्वस्त प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!