spot_img

नितीन हटवार यांना मातृशोक ,कमलबाई संभाजी हटवार यांचे निधन

नितीन हटवार यांना मातृशोक
कमलबाई संभाजी हटवार यांचे निधन

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांच्या मातोश्री कमलबाई संभाजी हटवार यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दीर्घ आजाराने रविवारी सकाळी १० वाजता दुःखद निधन झाले.
तेली समाजातील प्रतिष्ठित नागरिक असलेल्या कमलबाई हटवार सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असत.गेल्या अनेक दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या.त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात्त्य ३ मुले, ५ मुली सुना, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. सोमवार (दि.२२) रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक हिंदू स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार पार पडतील. त्यांच्या निधनाने हटवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!