बनावट नंबरप्लेट लावून बागडी ट्रॅव्हल्स सुसाट
●प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीदरम्यान फुटले बिंग
●दोन्ही वाहन ताब्यात घेऊन केली धडक कार्यवाही
●मिररवृत्त
●अमरावती
बनावट नंबर प्लेट लावून महामार्गावर सुसाट धावणाऱ्या दोन ट्रॅव्हल्सवर गुरुवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कार्यवाही करत दोन्ही ट्रॅव्हल्सला ताब्यात घेतले.वझ्झर येथील नाकाबंदीदरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्स ची कागदपत्रे तपासली असतांना हे बिंग फुटले असून गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
परतवाडा मार्गे इंदोर जाणारी दोन वाहने बनावट नंबर लावून जाणार असल्याची माहिती स.प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांना प्राप्त झाली.या माहिती द्वारे वझ्झर चेक नाका येथे कार्यरत असलेले मोटर वाहन निरीक्षक दीपक मेहेरकर यांनी नाकाबंदी दरम्यान ट्रॅव्हल्स क्र.एम पी १३ पी.३१७७,यूपी ९५ टी.४९६२ तपासणी केली असता कागदपत्रांमध्ये शंका निर्माण झाली त्यानंतर चेसिस क्रमांक तपासला असता दोन्ही वाहनांचे चेचीस क्रमांक एम एच ४० ए टी ५४०० व एम एच०९, सी वाय ०५३२ या नोंदणी क्रमांकावर नोंद असल्याचे स्पष्ट झाले.
दोन्ही वाहनांवर तब्बल सहा वर्षांपासून कर सुद्धा थकीत होता व तसेच कागदपत्र वैध नसल्याचे सिद्ध झाल्यानंतर दोन्ही वाहनांवर कार्यवाही करून वाहने ताब्यात घेण्यात आली.दोन्ही वाहने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने परतवाडा आगार येथे लावण्यात आलेली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.ही धाडसी कार्यवाही प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके व मोटर वाहन निरीक्षक दीपक मेहकर,राजन सरदेसाई,गणेश वरुटे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर ठोसरे यांनी केली असून या कार्यवाही मुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी दिली.
■कर चुकवेगिरी करण्यासाठी केला प्रकार■
यामधील वाहनांवर असलेला कर चुकविण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे निदर्शनास आले आहे यामध्ये मूळ चेचीस क्रमांक असलेल्याएम एच ४० ए टी ५४०० या क्रमांकाचे वाहन नागपूर येथील प्रियंका बागडी यांच्या नावे असून दुसरे वाहन क्र.एम एच०९,सी वाय ०५३२ चा अद्याप तपास लागलेला नाही.