चंद्रशेखर पसारी यांनी केली करोडोची फसवणूक
■17 अडत व्यापाऱ्यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
■मिररवृत्त
■अमरावती
धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडद व्यवसाय करून लिलावामध्ये कोट्यावधी रुपयांचा माल विकत घेऊन श्री शाम ट्रेडिंग कंपनीचे संचालक चंद्रशेखर पसारी यांनी तब्बल 17 अडत व्यवसायिकांना त्यांचे लक्षवेधी रुपये देण्यास नकार देऊन स्वतःच्या जीविताचे कमी-जास्त करून खोट्या केसेस मध्ये अदकवीण्याची धमकी दिली याबाबतीत 17 अडत व्यापाऱ्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे.
तक्रारी अनुसार पवन ओमप्रकाश लाहोटी ,कैलाश राठी, रुपेश वानखेडे दीपक राजनकर, किरण पणपालिया, राधेश्याम चांडक, रमेश ठाकरे , मित्रा भालेराव, निशांत पणपालीया ,शकुंतला गांधी, आशिष कापसे ,प्रमोद मुंदडा, महेश गंगन आशिष राठी, सचिन राठी ,मुकेश पणपालिया ,सुनील वानखेडे यांनी तक्रारीत असे म्हटले की चंद्रशेखर पसारी हे शाम ट्रेडिंग कंपनीचे संचालक आहेत आणि तक्रार करते धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यावसायिक म्हणून काम करतात. बाजार समितीमध्ये कष्टकऱ्यांनी आणलेल्या मालाचा लिलाव करून लिलावात यथोचित बोली लावणारास माल विक्री करून देतात. संबंधित कास्तकारास अडत व्यापारी तात्काळ रक्कम देतो त्यानंतर तेरा दिवसाच्या कालावधीत माल विकत घेणाऱ्या व्यावसायिक हा संबंधित अडत व्यवसायिकास रकमेचे भूगतान करतो .याप्रमाणे वर्ष 2023 चे माहे ऑगस्ट ते माहे सप्टेंबर दरम्यान सर्व अडत व्यवसाय कडून तब्बल 1 कोटी 3 लाख 23 हजार 412 रुपयांचा माल चंद्रशेखर पसारी यांनी लीलावामध्ये विकत घेऊन त्या संपूर्ण मालाची उचल बाजार समितीतून केली .काही कालावधीनंतर अडत व्यवसायिकांनी आपली लक्षावधी रुपयांची रक्कम चंद्रशेखर पसारी यास मागितली असता त्याने विविध कारणे दाखवून रक्कम देण्यास टाळाटाळ केली .त्यानंतर चंद्रशेखर पसारी यांनी अडत व्यवसायिकाना सांगितले की त्यांची मुलगी नेदरलँड येथे नोकरी करते आणि तिला करोडो रुपयांचे पॅकेज आहे ,ती जशी धामणगावात येईल ती सगळ्यांना रक्कम देईल. या आश्वासनावर अडत व्यवसायिक काही काळ थांबले. काही काळानंतर चंद्रशेखर पसारी यांची मुलगी नेदरलँड हुन परतली, 30 डिसेंबर 2023 रोजी सर्व अडत व्यावसायिक पसारी यांच्या राहत्या घरी गेले त्यावेळी पसारीच्या मुलीने स्पष्ट सांगितले की ती एक रुपये ही रक्कम देणार नाही. त्यानंतर पसारी यांनी देखील रक्कम देण्यास नकार दिला. 10 जानेवारी रोजी आरोपी चंद्रशेखर पसारी बाजार समितीच्या आवारात असल्याने सर्वांनी त्यांना आपली रक्कम पुन्हा मागितले असता त्यावेळेस पसारी याने शिवीगाळ केली आणि स्वतःच्या जीविताचे कमी जास्त करून खोट्या केसेस मध्ये फसवण्याची धमकी दिली. आरोपींने या आधी सुद्धा छत्तीसगड चे धम्मतरी येथे आर्थिक फसवणूक करून कितीतरी लोकांना लुबाडले आहे .आरोपीचे राजकीय आणि पोलीस विभागात मोठे संबंध असल्याने तो नेहमी सांगतो की माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. अनेक अडत व्यावसायिकांना लुबाडले असुन ते व तक्रार करण्यास पुढे आलेले नाही.
■फौजदारी वकील एड राजेश मूंदड़ा कडून सल्ला■
या पूर्ण घटनेने व्यथीत 17 अडत व्यवसायिकांनी कायदेशीर मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी सुप्रसिद्ध फौजदारी वकील अँड राजेश मुंदडा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना पूर्ण घटनेचा तपशील सांगितला .अँड राजेश मूंदड़ा यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व अडत व्यावसायिकांनी सत्य लेखि कथन तक्रार ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिली. ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी आरोपी चंद्रशेखर पसारी विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सर्वांना दिले आहे.एड.राजेश मुंदडा यांनी सर्व अडत व्यावसायिकांना यापुढेही कायदेशीर मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिलेले आहे.