spot_img

सावित्रीबाईंचा वैचारिक वारसा जोपासण्याचे कार्य आजच्या पिढीचे- डॉ. सुनीता बाळापुरे

सावित्रीबाईंचा वैचारिक वारसा जोपासण्याचे कार्य आजच्या पिढीचे- डॉ. सुनीता बाळापुरे

■माध्यमिक कन्या विद्यालयात स्नेहसंमेलन
■विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार

■मिररवृत्त

■नांदगाव पेठ

मुलींना त्या काळी शिक्षण मिळावे म्हणून समाजव्यवस्थेच्या विरोधात लढा देणाऱ्या सावित्रीबाई यांनी केलेल्या संघर्षामुळे आज आपण सावित्रीच्या लेकी समाजात मान उंचावून जगत आहोत त्यामुळे सावित्रीबाईंचा शैक्षणिक आणि वैचारिक वारसा आजच्या पिढीने जोपासायला हवा असे प्रतिपादन प्रा.डॉ. सुनीता बाळापुरे यांनी माध्यमिक कन्या विद्यालयाच्या स्नेहसंमेलनात केले. त्या स्नेह सम्मेलनाच्या अध्यक्ष म्हणून यावेळी बोलत होत्या.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की पुस्तकी ज्ञानपेक्षा माणूस होणं महत्वाचं असून स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपल्या सुप्तगुणांना समोर आणण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकांमध्ये एक वेगळी कला दडलेली असून स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपल्या कलेला वाट मोकळी करून द्यावी जेणेकरून भविष्यात त्या कलेमुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल.माध्यमिक कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी ३७ वे स्नेह संमेलन आयोजित करण्यातआले होते. याप्रसंगी विचारपिठावर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुनीता बाळापुरे या लाभल्या होत्या तर उदघाटक म्हणून डॉ. नयना दापुलकर यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती म्हणून पत्रकार मंगेश तायडे, सप्तरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुळे, प्रा. गणेश पोकळे,मुख्याध्यापिका नलिनी ढानके व सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा तिखे, माजी विद्यार्थिनी वैष्णवी मुळे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचेपूजन व हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित अतिथींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उदघाटिका डॉ. नयना दापुलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करतांना संगीत क्षेत्राबद्दल माहिती दिली. संगीत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून प्रत्येकाने संगीत कला जोपासावी असेही त्या म्हणाल्या. यावेळी गीत गायन करून त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत, लेझीम नृत्य तसेच विविध कलांचे अतिथींसमोर सादरीकरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अलका मेश्राम यांनी केले तर आभार सोनाली वानखडे यांनी मानले. या स्नेहसमेलनाला शिक्षिका ज्योती सोळंके, नितीन चौधरी, मयुरी बानासुरे,समीक्षा कापडे, वैष्णवी गोलाईत,, कैलाश सोनोने यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!