spot_img

लाच प्रकरणातून धामणगाव रेल्वे येथील मंडळ अधिकारी निर्दोष ,फिर्यादीने फसवण्याचा रचला होता डाव

लाच प्रकरणातून धामणगाव रेल्वे येथील मंडळ अधिकारी निर्दोष

■फिर्यादीने फसवण्याचा रचला होता डाव

■ऍड.प्रशांत भेलांडे यांचा यशस्वी युक्तिवाद

■मिररवृत्त
■अमरावती

धामणगाव रेल्वे येथील मंडळ अधिकाऱ्याने वडिलोपार्जित फेरफार करून आजीच्या नावे सातबारा करून देण्यासाठी पाच लक्ष रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपातून तत्कालीन मंडळ अधिकारी संजय मांडवधरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. ऍड. प्रशांत भेलांडे यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवाद व सत्यता पडताळणीनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने मांडवधरे यांना निर्दोष मुक्त केले.
घटनेची सविस्तर हकीकत अशी की वडिलोपार्जित शेतीचे फेरफार करून त्याचा सातबारा आजीच्या नावावर करून देण्यासाठी मंडळ अधिकारी मांडवधरे यांनी ऋषिकेश जगताप यांनी पाच लक्ष रुपयांची लाच मागितली अशी तक्रार ऋषिकेश जगताप यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत विभागाला केली. तडजोडीअंती १ जानेवारी २०१५ रोजी २५ हजार देण्याचे ठरले असे फिर्यादीने नमूद केल्यानंतर विभागाने सापळा रचून पडताळणी केली व त्यांनतर दुसऱ्या दिवशी पंच व फिर्यादी हे पंचवीस हजार रुपये घेऊन गेल्यानंतर मांडवधरे यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम नाकारली परंतु लाचलुचपत विभागाने कारवाई करत दत्तापुर पोलिसांच्या मदतीने सापळा यशस्वी करून मांडवधरे यांच्यावर ला.लु. प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असतांना सरकारी वकिलांनी आरोपी मंडळ अधिकारी संजय मांढवधरे यांच्या शिक्षेची मागणी रेटून धरली परंतु बचाव पक्षाच्या वतीने ऍड. प्रशांत भेलांडे यांनी युक्तिवाद करतांना न्यायालयाच्या निदर्शनास आणले की, सदर सातबारा प्रकरण हे मंडळ अधिकारी यांच्या कक्षेत नसून उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षेत येते,विशेष म्हणजे मंडळ अधिकारी मांडवधरे यांच्याकडे हे प्रकरण नव्हते तर सदर प्रकरण हे चांदुर रेल्वे उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षेत असून धामणगाव रेल्वे येथील मंडल5अधिकारी संजय मांडवधरे यांना केवळ फसवण्याचा डाव फिर्यादीचा असल्याचे भेलांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायमूर्तींनी बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून व सत्यता पडताळणी करून मांडवधरे यांची लाच घेतल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. यावेळी एड. भेलांडे यांना ऍड. रोहित उपाध्याय,एड. अश्फाक अहेमद, ऍड.अजय भक्त, एड. अजय कोकाटे यांचे सहकार्य लाभले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!