spot_img

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

■भाऊसाहेब देशमुख यांचा 125 वा जयंती उत्सव

■मिररवृत्त

■अमरावती

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ.पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालय अमरावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भाऊसाहेबांच्या कार्याचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात भाऊसाहेबांचे आजच्या काळातील विचार व महत्त्व या विषयावर19 डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे भारतीय राज्यघटनेतील योगदान या विषयावर 20 डिसेंबर रोजी वकृत्व स्पर्धा पार पडली. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, कृषी यासंदर्भातील कार्य दर्शवणारी पोस्टर प्रदर्शनी 22 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली.
23डिसेंबर रोजी पुस्तक प्रदर्शनी आणि 26 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यासोबतच 26 डिसेंबर रोजी सहज सुलभ कायदेविषयक सल्ला शिबिर घेण्यात आले. सर्वच कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना स्नेहसंमेलनात सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे.प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीते करिता परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!