spot_img

25 डिसेंबरचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

25 डिसेंबरचे राशिभविष्य:जाणून घ्या,
तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

■मिरर राशिभविष्य

सोमवार, 25 डिसेंबर रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रहस्थितीमुळे शुभ नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे सोमवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

●मेष : शुभ रंग: गुलाबी, शुभ अंक :४●

राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र धंद्यातील आवक वाढवेल. अंगी असलेले वक्तृत्व गुण कामी येतील. विरोधकांनाही तुमची मते पटवून देता यतील.

●वृषभ : शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ५●

महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून रहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरु शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. सुसंवाद साधा.

●मिथुन : शुभ रंग: मोतिया, शुभ अंक : ६●

नविन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पूंजी जपून वापरावी. सत्संगातून मन:शांती.

●कर्क : शुभ रंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : १●

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्व वाढेल. इतरांस न झेपणाऱ्या स्विकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज थोडी अहंकाराची बाधा होईल. करतील.

●सिंह : शुभ रंग: क्रिम, शुभ अंक : २●

आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वाणीत मृदुता ठऊन अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल.

●कन्या : शुभ रंग: पांढरा, शुभ अंक : ३●

नोकरी धंद्यात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा. उपासनेत खंड नको.

●तूळ : शुभ रंग: राखाडी, शुभ अंक : ८●

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तब्येतही थोडी नरमच राहील. पतीपत्नीं मधील वादावर मौन हा रामबाण उपाय राहील.

●वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता, शुभ अंक : १●

नोकरीच्या ठीकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा. पत्नीच आज योग्य सल्ले देईल.

●धनु : शुभ रंग:निळा, शुभ अंक : ९●

ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणी आंगावर काढू नका. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहीणींसाठी अतीव्यस्त दिवस .

●मकर : शुभ रंग: मोरपंखी, शुभ अंक : ८●

बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालाल. कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. गृहीणी आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देतील.

●कुंभ : शुभ रंग: आकाशी, शुभ अंक : ४●

घरसजावटी साठी काही पैसा खर्च कराल. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल वाढवावी लागेल. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आनंदी व उत्साही दिवस.

●मीन : शुभ रंग: डाळिंबी, शुभ अंक : ७●

नोकरदार वरीष्ठांच्या मागेपुढे करतील. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. नवोदीत लेखकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!