स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन
‘आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचे आहे’
या विषयावर होणार स्पर्धा
■मिररवृत्त
■अमरावती
स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देशहिताचे आहे या विषयावर ही स्पर्धा रंगणार आहे. ४ जानेवारी २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १०:३० वाजता या स्पर्धेला प्रारंभ होईल.
या स्पर्धेचे फेसबुक, युट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेत विजेता संघाला स्व.माणिकराव घवळे स्मृती फिरता चषक प्रदान करण्यात येईल. विषयाच्या अनुकूल व प्रतिकूल बाजूस मते मांडणाऱ्या दोन स्पर्धाचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरेल. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यास ११००१ रु. रोख,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय ७००१ रु.रोख सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व तृतीय पारितोषिक ५००१ रु. रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २००१ रु व १५०१ रु रोख व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे हे २२ वे वर्ष असून, स्पर्धेच्या माध्यमातून महत्वपूर्ण विषयावर मत मांडण्याची संधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील नावाजलेले वादविवादपटू या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.ही स्पर्धा निःशुल्क असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख ,संयोजक प्रफुल्ल घवळे व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीकरीता डॉ. शीतल तायडे, ९८२२५२७८०८, डॉ.अमित गावंडे ९४२२९४३२९८, प्रा.रणजित देशमुख ९९७५७७८१८ ,मयुर चौधरी ७७९८०६०५०० गौरव इंगळे ९४०३३८७७५२, रत्नाकर शिरसाट ८८५७९११०३६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.