spot_img

प्रा. मोरेश्वर इंगळे युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

प्रा.मोरेश्वर इंगळे युवासेनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी

■मिररवृत्त

■नांदगाव पेठ

शिवसेनेचे कट्टर समर्थक प्रा. मोरेश्वर इंगळे यांची युवासेना (उबाठा) जिल्हा सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये पुन्हा त्यांची अमरावती जिल्हा सरचिटणीसपदी वर्णी लागली असून प्रा.मोरेश्वर इंगळे यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी गतवर्षी युवा सेनेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तळागाळातील कार्यकर्ते,युवा वर्गाला एकत्रित करून त्यांनी अधिकाधिक कार्यकर्त्यांची फौज युवा सेनेला जोडली.प्रत्येक मेळावा, कार्यक्रम, आंदोलनात सहभागी होऊन मोरेश्वर इंगळे यांनी युवा सेनेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा अमरावती जिल्हा सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा प्रदान केल्या.
युवासेनेचे वरूण सरदेसाई,श्याम देशमुख, प्रीती बंड,विशाल केचे,आसावरी देशमुख, सागर देशमुख,आशिष धर्माळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कार्य करीत असून भविष्यात आणखी चांगले काम करून पक्षाला मजबूत करण्याचे आपले ध्येय असल्याचे यावेळी प्रा.मोरेश्वर इंगळे यांनी सांगितले.मोरेश्वर इंगळे यांच्या नियुक्तीबद्दल युवासेना, शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!