spot_img

अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करा,वंचितचे सागर भवते यांची मागणी

अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करा

■वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर भवते यांची मागणी

■मिररवृत्त
■तिवसा
महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊन तिवसा तालुक्यातील कपाशीवर आलेल्या बोंडअळीचे सर्व्हेक्षण करण्यात यावे व चालु असलेल्या हिवाळी अधिवेशनातच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी निवेदनातून केली आहे.
तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीचा पेरा केला असून सद्यस्थितीत कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले आहे तेव्हा बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे सर्व्हेक्षण करण्यात यावे तसेच पांदण रस्त्या अभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पांदण रस्त्याची अंमलबजावणी प्रभावी पणे करण्यात यावी. या दोन्ही प्रश्नावर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करून नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने तिवसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते, मनिष खरे, राहुल मनवर, बबलू मुंद्रे, ज्ञानेश्वर राऊत, शालिकराम ईखार, मारोती गुरड, रवींद्र वानखडे, मयूर घायवट, अमोल विघ्ने, रामेश्वर अमझरे, निखिल बाखडे, अरुण वावरे, गजानन शिंदे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!