spot_img

मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024

मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा

■ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन

■व्होटर हेल्पलाईन ॲप व voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळ वापरा

■मिररवृत्त

■अमरावती

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. पाण्डेय यांनी आज अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती व बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, रणजित भोसले, भातकुलीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पी.एम. मिन्नू, तहसीलदार श्री. लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांना ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रावर मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, मतदानाविषयी मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांचे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. त्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक नमूना भरुन घेण्यात यावेत. स्थलांतरीत किंवा मयत झालेल्या मतदारांसंबंधी खात्री करुन मतदार यादी अद्ययावत करण्यात यावी. घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित बीएलओकडून मतदारांचे सर्वेक्षण करण्यात यावे. मतदाराच्या नाव, फोटो व पत्त्यामध्ये बदल असल्यास अचूकप्रमाणे सुधारणा करुन घेण्यात यावी. तसेच मतदारांचे आक्षेप किंवा शंकांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

मतदारांच्या काही निवडणूकविषयक तक्रारी असतील त्या तत्परतेने सोडविल्या जाव्यात. मतदार निवडणूकविषयक तक्रारी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याबाबत जनजागृती करावी. शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचे नाव असतात. कोणत्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव पाहीजे हे मतदाराला विचारणा करून तेथील यादीत नाव ठेवावे. ज्या कुटूंबामध्ये 10 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आहे, अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी. नवमतदार तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in व ceo.maharashtra.gov.in चा वापर करण्यासंबंधी तसेच जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरण्याबाबत प्रसिध्दी पत्रकाव्दारे जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!