spot_img

गाफील चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

गाफील चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले
१५ डिसेंबर ला होणार होते प्रदर्शन

अमरावती/प्रतिनिधी

सेन्सॉर बोर्डच्या काही अनपेक्षित कारणांमुळे बहुचर्चित गाफील चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.१५ डिसेंबर ला गाफील राज्यभरात प्रदर्शित होणार होता मात्र ऐन वेळी सेन्सॉर बोर्डाकडून विलंब झाल्याने पुढील तारीख लवकरच निश्चित होईल अशी माहिती चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे यांनी माध्यमांना दिली.
यावेळी निर्माते मनोज भेंडे,दिग्दर्शक डॉ. मिलिंद ढोके, अभिनेता आदित्य खुळे, वैष्णवी बरडे यांची उपस्थिती होती.अमरावतीच्या मातीत निर्माण झालेला गाफील चित्रपट सध्या राज्यातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाच्या टिझर ने लाखो प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी गाफील चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता मात्र सेन्सॉर बोर्ड ने सेन्सॉर सर्टिफिकेट तसेच ट्रेलर सर्टिफिकेट देण्यात न आल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे निर्माते मनोज भेंडे यांनी यावेळी सांगितले.
चित्रपटाची तारीख नव्याने जाहीर करण्यात येणार असून सेन्सॉर सर्टिफिकेट तसेच ट्रेलर सर्टिफिकेट लवकरच देणार असल्याचे आश्वासन सेन्सॉर बोर्ड ने दिले असल्याची माहिती सुद्धा आयोजकांनी दिली. त्यामुळे आणखी काही दिवस प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावेळी गाफील ची संपुर्ण टीम उपस्थित होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!