spot_img

नांदगाव पेठ येथे निशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीर

नांदगाव पेठ येथे निशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबीर

●१५ डिसेंबर ला ग्रामपंचायत प्रांगणात आयोजन
●प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ करणार तपासणी

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जीवनविकास संस्था नागपूर तसेच भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर रोजी नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात निशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वतीने आयोजित या महाआरोग्य शिबिराच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
या आरोग्य शिबिरात मेडिसिन, स्त्री रोग, अस्थीरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग,न्यूरॉलिजी, शल्य चिकित्सक, कान, नाक, घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जन),किडनी रोग तज्ञ, हृदयरोग चिकित्सक आदी व्याधींवर तज्ञ वैद्यकीय चिकित्सक तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णांना औषधोपचार देखील निशुल्क असून शिबीरस्थळी रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात येईल तसेच अधिक तपासण्या किंवा रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असल्यास शिबीरस्थळावरून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आयोजकांच्या वतीने निशुल्क वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शिबिराला सकाळी १० वाजता प्रारंभ होणार असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे.परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच वेळेवर गैरसोय होऊ नये यासाठी आपल्या नावाची नोंदणी शिबिरापूर्वीच करावी असे आवाहन मुख्य आयोजक रविराज देशमुख यांनी केले आहे. शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी
सचिन इंगळे-9673160777,
अमोल व्यवहारे-9767668421,
अनुप भगत-96651065671,
अंकुश चौधरी-8888044458
यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!