spot_img

सावर्डीच्या लेकीची जिद्द,पोलीस उपनिरीक्षकपदी निवड, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

सावर्डीच्या लेकीची जिद्द,पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

नांदगाव पेठ/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सावर्डी येथील प्रतीक्षा रुपचंद खोब्रागडे हिने यश संपादन करत तिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.आहे त्या परिस्थीतीशी दोन हात करत केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतीक्षाने हे यश संपादन केले आहे.कोणत्याही प्रकारच्या शिकवणीला न जाता, वायफळ खर्च न करता, घरूनच अभ्यास करून प्रतीक्षा खोब्रागडे हिने पोलीस उपनिरीक्षकपदी मजल मारली.
प्रतीक्षाचे प्राथमिक शिक्षण सावर्डी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.त्यानंतर नांदगाव पेठ येथे पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण आणि उच्च शिक्षण अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी सुरू ठेवली.कोणत्याही प्रकारची शिकवणी किंवा अभ्यासावर निरर्थक खर्च न करता मिळेल त्यांच्याकडून नोटस घेऊन व काही पुस्तके विकत घेऊन प्रतीक्षाने घरूनच अभ्यास सुरू केला.२०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्या परीक्षेत अपयश आले मात्र आपली जिद्द व चिकाटी कायम ठेवत २०२२ मध्ये प्रतीक्षाने पुन्हा परीक्षा दिली. परीक्षेनंतर ग्राउंड आणि मुलाखत मध्ये सुद्धा प्रतीक्षा यशस्वी झाली आणि १ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकालात २९० गुण घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली.
अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेल्या प्रतीक्षाने मिळविलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.सावर्डी गावातुन पोलीस उपनिरीक्षक झालेली प्रतीक्षा ही पहिली युवती असुन तिने मिळविलेल्या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतीक्षाने मिळविलेल्या या यशाबद्दल खा. बळवंत वानखडे, आ. यशोमती ठाकूर, माजी सरपंच राजकुमार मेश्राम, राहुल उके यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!