राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेचे १९ ते २७ ऑक्टोबर दरम्यान आयोजन
●अँथे २०२४ शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सुरवात
अमरावती : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लि. आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम अँथे या आपल्या प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षेची १५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली असून, या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची घोषणा केली आहे. ही परीक्षा इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कारांसह शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी देते. या परीक्षेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटरच्या पाच दिवसांची सहल मोफक मिळणार आहे. फ्लोरिडा येथे असलेले जॉन एफ. केनेडी स्पेस सेंटर हे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) अमेरिकेतील दहा फील्ड केंद्रांपैकी एक आहे.ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशच्या विस्तृत कोग प्रोग्रामचा फायदा होईल.
अँथे २०२४ परीक्षा भारतातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १९-१७ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचे निकाल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आठ नोव्हेंबर रोजी, इयत्ता सातवी ते नववीचा निकाल १३ नोव्हेंबर रोजी आणि इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातील. अधिक माहिती anthe.aakash.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.