spot_img

पुण्यातील तळवडे भागात गोदामाला आग,सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील तळवडे भागात गोदामाला आग,सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

●मिररवृत्त

●पिंपरी 【पुणे】

पुणे जिल्ह्यातील तळवडे भागात गोदामाला आग लागली आहे. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग एवढी भीषण होती की त्यामध्ये सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तळवडे एमआयडीसीमधे वाढदिवसाला लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सच्या कंपनीत आग लागली आहे. आत्तापर्यंत 6 मृतदेह मिळाले आहेत आणि अजून काही जखमी आहेत. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचा माहिती आहे.

काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. घटनास्थळी सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेलले आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. वाढदिवसालला लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग लागली तेव्हा कारखान्यात २५ कामगार काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.काहींनी बचावासाठी त्यावेळी पळ काढला असून ६ जणांनी जीव गमावला आहे. तर २ जण गंभीर आहेत. बाकी जखमी कामगारांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!