गो- सेवा ही प्रत्येक हिंदूंची जबाबदारी- शक्ती महाराज
नवजीवन गोरक्षण मध्ये गो ग्रास तुला
शेकडो गो-प्रेमींची उपस्थिती
मिररवृत्त
नांदगाव पेठ
गाय आणि गोवंश यांचे हिंदू धर्मात मोठे महत्व आहे, मात्र काही हिंदू बांधव केवळ पैश्यासाठी गाय आणि गोवंशाला कत्तलीखान्यात पाठवतात ही आजची शोकांतिका आहे.हिंदू बांधवांनी यापुढे गाय किंवा गोवंश कत्तलखान्यात न पाठवता त्यांची आपल्याच घरी सेवा करा.गो-सेवा ही प्रत्येक हिंदूंची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन श्री.1008 पिठाधिश काली माता मंदिर संस्थान अमरावतीचे शक्ती महाराज यांनी व्यक्त केले.
गोपाष्टमी निमित्य श्री. भगवान परशुराम गो सेवा संघ व नवजीवन गोरक्षण संस्था नांदगाव पेठ यांच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी नवजीवन गोरक्षण संस्थेमध्ये शक्ती महाराज तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट यांची गो ग्रास तुला करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला सत्कारमूर्ती शक्ति महाराज,डॉ.गोविंद कासट,दीपक कौसकिया, सुमनताई परांजपे,अजितपाल मोंगा,संतोष गहरवार,गणेश हिरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून गोसेवा आणि गोरक्षण यावर भर देतांना जनजागृती करण्यात आली.गाय किंवा गोवंश यांना पैश्यासाठी कत्तलखान्यात पाठवू नका, आपल्याकडून गो सेवा होत नसल्यास गोरक्षण संस्थेकडे गाय किंवा गोवंश आणून द्यावे, गायीला शिळे अन्न टाकू नये,प्लास्टिक पिशवी मध्ये कोणतेही अन्न गायी समोर ठेवू नये गाय अन्नासोबत प्लास्टिक पिशवी पण खाऊन घेते त्यामुळे एका वर्षात हजारो गोवंश आणि गायी कर्करोगामुळे मरण पावतात अश्या प्रकारची जनजागृती सुद्धा यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला श्रीकृष्ण बाळापूरे, नितीन हटवार, मनोज मोरे,पत्रकार मंगेश तायडे, राजेंद्र तुळे, मंगेश गाडगे,किशोर साखरवाडे,लुकेश यावले, राजेश इंगोले,विवेक सहस्त्रबुद्धे,सोनाली प्रांजळे,स्नेहल मुळे, कल्याणी गेडाम, अशोक राठोड,कल्पना चोपकार, संजय पकडे,तृप्ती चोपकार, सुमन चोपकार,सुमित सावरकर, अनंता शेंदरकर, उमेश मोर्षे यांचेसह असंख्य गोप्रेमी उपस्थित होते.
■पशु, जनावर उल्लेख टाळावा■
ज्या गायी मध्ये ३३ कोटी देवांचा वास आहे अश्या गायीला गोवंशाला आपण जनावर किंवा पशु म्हणणे उचित नाही.ते पशु, जनावर नाहीत त्यामुळे हा उल्लेख यानंतर प्रत्येकाने टाळावा. गाय, गोमाता किंवा गोवंश हाच उल्लेख करावा.
●अजितपाल मोंगा
●गोसेवक