राहुलजी आणि काँग्रेस संविधानाच्या वाटेवर निरंतर अविरत- ॲड. ठाकूर
मिररवृत्त
प्रतिनिधी,मुंबई
काँग्रेसचे लोकप्रिय नेते राहुलजी गांधी तसेच काँग्रेस पक्ष संविधानाने आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करीत आहे. संविधानाच्या आरक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीमागे निस्वार्थीपणे काँग्रेस आपले बळ लावत असते. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला राहुलजी गांधी यांनी शुभेच्छा पाठवून संविधानाप्रती आपली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली आहे. म्हणूनच अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने घर घर संविधान अभियान राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या ॲडवोकेट यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
2014 पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता माजवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो आहे. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल तर एकच सशक्त उत्तर आहे आणि ते म्हणजे देशाचे संविधान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला तर तो नेहमीच प्रगतीपथावर राहील. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही मात्र देशांमध्ये असलेली शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते याचा गार्ड विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानावरील याच निष्ठेमुळे देशात आणि राज्यात सनातनी शक्ती जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करीत असताना संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे तरच इथली शांतता आणि एकात्मता टिकून राहील यासाठी आपण घर घर संविधान हे अभियान अमरावती जिल्ह्यात राबवणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
संविधानाच्या रक्षणासाठी राहुलजींच्याही आंबेडकरांना शुभेच्छा
दरम्यान देशाचे संविधान हे अबाधित रहावे, यासाठी विविध संघटना आणि पक्षांच्या माध्यमातून सर कार्य होत असेल तर त्याला निर्देशक पणे पाठबळ देणे आणि संविधानाच्या रक्षणासाठी उभे राहणे ही काँग्रेसची आणि राहुलजी गांधी यांची विचारधारा आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या संविधान रक्षण सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणे प्रचार कार्यामुळे शक्य नसले तरी राहुलजी गांधी यांनी आंबेडकरांच्या या संविधान रक्षण प्रयत्नांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी यापुढेही आपण तुमच्यासोबत निश्चित उभे राहू असेही राहुलजी यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये संविधानावर सातत्याने होणारे हल्ले हे अत्यंत चिंताजनक असून समाजातील प्रत्येक घटकांनी आता संविधानाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभे राहिले पाहिजे, आणि त्यासाठीच काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, या राहुलजींच्या मार्गदर्शनाखाली आता पुन्हा एकदा आम्ही काम करत आहोत आणि घर घर संविधान अभियान हा त्याचाच एक भाग असल्याचे ॲडवोकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.