spot_img

जा,हमास दहशतवाद्यांना जगभरातून शोधून काढा! मोसादला नेतान्याहूंचे आदेश

स्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसदला एक महत्त्वाची कामगिरी दिली आहे. जगभरात जिथे कुठे हमासचे दहशतवादी असतील त्यांना शोधून काढून त्यांचा खात्मा करा असे आदेश नेतान्याहू यांनी दिले आहेत.

एका पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. ‘गाझामध्ये असो अथवा गाझाच्या बाहेर हमासचे दहशतवादी जिथे कुठे असतील तिथून त्यांना शोधून काढा आणि त्यांचा खात्मा करा असे मी आदेश दिले आहेत.’ हमासच्या बहुतांश दहशतवाद्यांनी इतर देशांचा आसरा घेतला आहे. ते खासकरून आखाती देश कतारमध्ये आश्रयाला असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर देशात बसून ते दहशतवादी कारवाया घडवत असतात असा आरोप केला जातो.

एकीकडे नेतान्याहू हे आदेश देत असताना इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम होऊन इस्रायली ओलीस नागरीक शुक्रवारपूर्वी आपल्या घरी परतणं मुश्कील असल्याचं इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटले आहे. या ओलिसांची सुटका व्हावी यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाची हानेगबी यांनी सांगितले. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविरामासाठी जो समझौता होईल त्यानुसार ओलिसांची सुटका होईल असे ते म्हणाले, आणि हे शुक्रवारच्या आधी होऊ शकत नाही.

तात्पुरत्या युद्धविरामानंतर इस्रायल हमासविरोधात पुन्हा युद्धाला सुरुवात करणार असल्याचे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले आहे. आपण ही बाब अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही कळवली असल्याचे ते म्हणाले. नेतान्याहू यांनी म्हटले की ‘मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, हे युद्ध पुढे सुरू राहणार आहे. जोपर्यंत आमचा उद्देश्य सफल होत नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील.’ 240 इस्रायली नागरिकांना सुखरूप घरी पोहोचवणं आणि हमासचा खात्मा करणं हे इस्रायलचे उद्दीष्ट्य आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!