spot_img

अमेरिकेमध्ये घुसून दहशतवाद्याचा गेम करण्याचा भारताचा प्लान USA ने उधळला?

भारतावर गुरपतवंत सिंह पन्नूला मारण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरपतवंत सिंह पन्नू खलिस्तान समर्थक दहशतवादी आहे, तो सतत भारताविरोधात गरळ ओकत असतो. अमेरिकेने भारताकडे हा विषय मांडला. त्यावर अशा प्रकरची कृती आमच्या धोरणाचा भाग नाही असं भारताकडून सांगण्यात आलं, असं ॲड्रिन वॅटसन म्हणाले. ते व्हाइट हाऊसचे प्रवक्ते आहेत. “भारत सरकार याची चौकशी करेल. पुढच्या काही दिवसात ते या बद्दल अधिक बोलतील. आम्ही आमच्या अपेक्षा त्यांना कळवल्या आहेत. जो कोणी यामागे आहे, त्याला जबाबदार धरलं पाहिजे” असं ॲड्रिन वॅटसन म्हणाले.

अमेरिकन सरकारने सर्वोच्च स्तरावर भारताकडे हा विषय उपस्थित केलाय. तितक्याच गांभीर्याने हा विषय हाताळला जाईल असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितलं. सुरक्षाविषयक चर्चेच्यावेळी अमेरिकेकडून भारताला या संदर्भात काही माहिती मिळाली. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूला अमेरिकन भूमीवर संपवण्याचा भारताचा कट अमेरिकेने उधळून लावला. ब्रिटनमधील फायनान्शिअल टाइम्स या वर्तमानपत्राने ही बातमी दिली होती. त्यानंतर यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

भारतविरोधी दहशतवाद्यांच्या मागे काळ लागला

गुरपतवंत सिंह पन्नू सिख फॉर जस्टिस संघटनेचा नेता आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा दोन्ही देशांच नागरिकत्व आहे. भारताने सिख फॉर जस्टिसला दहशतवादी संघटना ठरवलं आहे. सध्या भारतविरोधी ज्यांनी कारवाया केल्या आहेत किंवा जे कारवाया करत आहेत, त्यांना वेचून-वेचून संपवलं जातय. अनेक दहशतवादी इथे गुन्हे करुन परदेशात लपून बसले आहेत. त्यांना शोधून-शोधून संपवलं जातय. यामागे कुठली तरी अज्ञात शक्ती आहे. पाकिस्तानात तर भारतविरोधी दहशतवाद्यांच्या मागे काळ लागला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!