spot_img

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे वामन म्हात्रेचा निषेध,महिला पत्रकाराच्या समर्थनार्थ उतरले रस्त्यावर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे वामन म्हात्रेचा निषेध

महिला पत्रकाराच्या समर्थनार्थ उतरले रस्त्यावर

●मिररवृत्त
●अमरावती

बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देवून अपमानस्पद वागणूक देणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या नेतृत्वात शुक्रवार(ता.२३) रोजी निषेध आंदोलन करण्यात आले. या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकणात पत्रकार या नात्याने तेथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी लज्जा उत्पन्न होईल, अशा अश्लील भाषेत महिला पत्रकार जाधव यांच्याशी संभाषण केले. या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलीस यंत्रणा टाळाटाळ करत आहे.त्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांच्या वर्तनाचा व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून काळे वस्त्र परिधान करून निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी म्हात्रे यांच्या निषेधाच्या घोषणा देत पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

महिला पत्रकार मोठ्या संख्येने कार्यरत आहेत त्यांना काम करतांना सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे, मात्र शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी कर्तव्य बजावणार्या महिला पत्रकाराला उद्देशन जे वक्तव्य केले, ते निषेधार्ह आहे, त्यामुळे त्यांना अटक करून महिला पत्रकारास न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे यांनी यावेळी केली.
आंदोलनात श्रुती कथे, अर्चना रक्षे, ज्येष्ठ पत्रकार अशोक भाई जोशी, मनीष गुडधे, भारत पाटील, राज माहुरे, सागर डोंगरे, चंद्रशेखर मेहरे, यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पत्रकार बांधव, भगिनी सहभागी झाले होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!