•मिरर वृत्त
•असदपूर प्रतिनिधी
राक्षाबंधाणाचा सण बंध आणि नातेसंबंध वाढवते मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणते, त्यांचे नाते मजबूत करते आणि नवीन आठवणी निर्माण करते.एकयान इंग्लिश स्कूल असदपूरच्या प्रांगणात 20 ऑगस्ट, 2024 रोजी रक्षाबंधनाच्या उत्साहात राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थी, आणि कर्मचारी सदस्यांचा उत्साही सहभाग दिसला, ज्यांनी सुंदर राख्या तयार करण्यात आपली सर्जनशीलता आणि कौशल्य दाखवले. सदर स्पर्धा सर्जनशीलता आणि कौशल्य-निर्मितीला प्रोत्साहन देने,सांस्कृतिक कौतुकास प्रोत्साहन देने ,उत्तम मोटर कौशल्ये आणि हँडवर्क विकसित करने,आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवने, आत्मविश्वास आणि स्पर्धेची भावना विकसित करण्याकरिता ही स्पर्धा घेण्यात आली नर्सेरी , जुनिअर केजी , सीनीअर के जी अशा तीन गटात विभागली गेली. स्पर्धकांनी राखीच्या अनोख्या आणि क्लिष्ट डिझाईन्स तयार करण्यासाठी धागे, मणी, फुले आणि रंग यांसारख्या विविध साहित्याचा वापर केला. प्रदर्शनातील सर्जनशीलता आणि प्रतिभा पाहून प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांची घोषणा केली. नर्सेरी मधून प्रथम क्रमांक कु. तेजल अमोलतेलगोटे , द्वतीय क्रमांक कु. नव्या रोशन गावंडे तृतीय क्रमांक कु. अद्विका स्वप्नील गाढवे तर जुनिअर केजी मधून प्रथम क्रमांक राजवीर निखील खोडके , द्वतीय क्रमांक शाश्वत विशाल गावंडे तर तृतीय क्रमांक कु.रुद्राक्षी प्रफ्फुल उल्हे , तसेच सीनीअर के जी मधून प्रथम क्रमांक अधिराज आकाश गिरी , द्वतीय क्रमांक आर्यराज धीरज गावंडे तर तृतीय क्रमांक राम विपिन बूब याने प्राप्त केला
सदर स्पर्धा गोविंद चॅरिटेबल सोसायटी अमरावती चे अध्यक्ष तात्यासाहेब उर्फ अंबादास तायडे, सचिव डॉ. शीतल तायडे , एकायन इंग्लिश स्कूल असद्पूर च्या संचालिका डॉ स्मिता तायडे,सदस्य श्री. वैभव विलास तायडे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली . करीता कु.वैष्णवी ठाकरे कु. शिवानी ठाकूर कु. नियती गावंडे , सौ. योगीताताई नितनवरे यांनी परिश्रम घेतले.